भाग्यश्री मांगले यांचा २६ वर्षांपासून असलेला छाती व खांद्याच्या मधील ट्यूमर काढण्यात डॉक्टरांना पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले. अतिशय दुर्मिळ आणि अनोखी शस्त्रक्रिया यावेळी करण्यात आली. भाग्याशी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ट्युमरचे रुपांतर कर्करोगाच्या ट्यूमरमध्ये झाले. डॉक्टरांच्या १७ तासाच्या शर्तीच्या प्रयात्नानंतर मांगले यांना अडीच किलोच्या ट्यूमर पासून मुक्तता मिळाली.

मुळच्या रोहा, जिल्हा रायगडच्या असणाऱ्या भाग्याशी मांगले या पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर येथे उजव्या हाताचे दुखणे व अर्धांगवायूच्या उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये आल्या होत्या. यावेळी डॉक्टरांच्या असे निदर्शनास आले की त्यांच्या छाती व खांद्याच्या मध्ये २० सेंटीमीटर एवढा मोठा ट्यूमर आहे.

हा ट्यूमर भाग्यश्री यांना १९९३ सालापासून असून तो कमी करण्यासाठी त्यांनी काही शस्त्रक्रिया देखील केल्या होत्या मात्र त्या अयशस्वी ठरल्या. त्यांनी एलोपॅथिक व आयुर्वेदिक उपचार केले तसेच काही ढोंगी डॉक्टरांच्या उपचारामध्ये त्या ट्यूमर वर गोंदवून देखील घेतले होते, मात्र कोणताही गुण आला नाही. आता तो ट्यूमर एवढा मोठा झाला होता की त्यामुळे श्वासनलिका दबली जाऊन त्यांना श्वासोच्छवास घेणे अशक्य होत होते. तसेच उजव्या हाताकडे जाणाऱ्या सर्व रक्त वाहिन्या देखील दाबल्या गेल्या होत्या व हात निकामी झाला होता.