scorecardresearch

Premium

महिलेच्या पोटात साडेपाच किलोची गाठ; शस्त्रक्रिया यशस्वी

पोटातील तब्बल साडेपाच किलो वजनाच्या गाठीमुळे प्रकृतीच्या विविध तक्रारींचा सामना करणाऱ्या महिलेला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

health
संग्रहित छायाचित्र

पुणे : पोटातील तब्बल साडेपाच किलो वजनाच्या गाठीमुळे प्रकृतीच्या विविध तक्रारींचा सामना करणाऱ्या महिलेला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. संबंधित महिला ३८ वर्षांची असून मासिक पाळीच्या तक्रारी, ओटीपोटात दुखणे, अनियमित रक्तस्त्राव अशा समस्यांनी ग्रासली होती. तिच्या रक्तातील लोहाची पातळीही ३.४ पर्यंत कमी झाली होती. उपचारांचा भाग म्हणून तिच्यावर शस्त्रक्रिया केली असता तिच्या पोटात साडेपाच किलो वजनाचे फायब्रॉईड असल्याचे दिसून आले.

खराडी परिसरातील मदरहूड रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. प्रीतिका शेट्टी म्हणाल्या,की एक वर्षापासून या रुग्णाला मेनोरेजिया म्हणजे जास्त आणि दीर्घकाळ रक्तस्त्रावाची समस्या होती. सोनोग्राफी केल्यानंतर तिच्या गर्भाशयाला इजा आणि मोठी गाठ असल्याचे दिसून आले. गर्भाशयातील गाठी या बहुतांशवेळा कर्करोगकारक नसतात. तिच्या मूत्रपिंडावर ही गाठ असल्याने दोन्ही मूत्रवाहिन्यांच्या कार्यात अडथळा येत होता. तिचा मूत्रमार्ग पूर्ववत करणे,तसेच गाठ काढणेही आवश्यक होते. त्यामुळे तिच्या संमतीने तिचे गर्भाशय काढून टाकण्यात आले.

1.5 kg tumor on neck, tumor from neck removed after surgery
मुलाच्या मानेतून काढली दीड किलोची गाठ, शीव रुग्णालयातील डॉक्टरांनी केली तब्बल सहा तास यशस्वी शस्त्रक्रिया
28 year old woman who kidnapped 18 month child arrested within 12 hours
मुंबईः दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला १२ तासांत अटक; मुलाची सुखरूप सुटका
five decision of shinde fadnavis government taken back in one and a quarter years
उलटा चष्मा : मर्यादा २५ हजार करून टाका!
Woman Beten
धक्कादायक! महिलेला निर्वस्त्र करुन मारहाण, मूत्र प्राशन करण्यासाठीही बळजबरी

डॉ. शेट्टी म्हणाल्या,की मासिक पाळीतील रक्तस्त्राव दीर्घकाळ सुरू राहणे, थकवा, अतिरिक्त वेदना ही चिंतेची कारणे आहेत. या लक्षणांकडे महिलांनी दुर्लक्ष करू नये. नियमित व्यायाम, आहार आणि विश्रांती यांचे वेळापत्रक सांभाळावे. मासिक पाळीच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही डॉ. शेट्टी यांनी केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tumor woman stomach surgery successful pune print news ysh

First published on: 19-07-2022 at 11:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×