Two accused who attacked youth with weapon arrested in Kothrud pune | Loksatta

पुणे : कोथरुडमध्ये युवकावर शस्त्राने वार; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

युवक मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळेस आरोपींनी युवकाला शिविगाळ करत त्याच्यावर कोयत्याने वार केले.

पुणे : कोथरुडमध्ये युवकावर शस्त्राने वार; आरोपींविरोधात गुन्हा दाखल
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

पुण्यातील कोथरुड भागात किरकोळ वादातून युवकावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यश कालीदास जगताप (वय १८, रा. साईनाथ वसाहत, कोथरुड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सचिन शंकर कदम (वय २३), प्रवीण शंकर कदम (वय २९, दोघे रा. साईनाथ वसाहत, कोथरुड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- पुणे : रस्ते बांधणी कंपनीची नऊ कोटी रुपयांची फसवणूक; प्रकल्प अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल

आरोपी सचिन आणि प्रवीण हे यशच्या ओळखीचे आहेत. रात्री अकराच्या सुमारास यश मित्रांबरोबर साईनाथ वसाहतीत गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी आरोपींनी यशला शिवीगाळ करुन त्याच्यावर कोयत्याने वार केले. किरकोळ वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक फडतरे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 14:46 IST
Next Story
पुणे : रस्ते बांधणी कंपनीची नऊ कोटी रुपयांची फसवणूक; प्रकल्प अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल