scorecardresearch

पुणे : कामगार विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच, महिलेसह दोघांना पकडले

योगिता अरुण शेंडगे (वय ४०, रा. थेरगाव) आणि फारूख हनिफ पठाण (वय ५६, रा. बोपोडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

acb pune
बांधकाम व्यावसायिकाकडून लाच घेताना सिंचन विभागातील अधिकाऱ्याला पकडले(लोकसत्ता ग्राफिक्स)

पुणे : कामगार विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दोन दलालांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. या प्रकरणी या दोघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

योगिता अरुण शेंडगे (वय ४०, रा. थेरगाव) आणि फारूख हनिफ पठाण (वय ५६, रा. बोपोडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

हेही वाचा – पुणे : पुसाणे गाव होणार लोडशेडिंगमुक्त! दैनंदिन गरजांसाठी सोलर सिस्टीमद्वारे मिळणाऱ्या विजेचा होणार वापर

हेही वाचा – “काँग्रेस, राष्ट्रवादीला मत म्हणजे विकास थांबवणे”, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल; म्हणाले, “दोन्ही पक्षांनी..”

तरुणाच्या आईचे गेल्या वर्षी निधन झाले. महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळात तरुणाच्या आईची बांधकाम मजूर म्हणून नोंद आहे. तक्रारदाराच्या आईचा कामगार विमा म्हणून दोन लाख ३४ हजार रुपये मिळणार होते. कामगार कार्यालयाकडून ही रक्कम मिळवून देण्यासाठी शेंडगे हिने तरुणाकडे एक लाख रुपयांची मागणी केली. तरुणाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 14:09 IST
ताज्या बातम्या