पिंपरी: चिंचवडच्या वाकड पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या अट्टल दोन गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून २४ लाख ६८ हजारांचे ६० तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. लखनसिंग क्रिपालसिंग सरदार वय- २८ आणि सतपालसिंग क्रिपालसिंग सरदार वय- २६ रा. घासकौर दरवाजा, गुजरात अशी गुन्हेगार सख्ख्या भावांची नाव आहेत. त्यांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पिंपरी- चिंचवड शहरात घरफोड्या करणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लखनसिंग आणि सतपालसिंग हे दोघे सख्खे भाऊ असून ते मूळ गुजरात राज्यातील आहेत. शहरातील विविध भागात एकूण त्यांनी ३५ घरफोड्या केल्याचं तपासात उघड झाले आहे. गुजरात राज्यात देखील ३५ पेक्षा अधिक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. दरम्यान, त्यांच्या मागावर पिंपरी- चिंचवड पोलिस होते.
वाकड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी भास्कर भारती, स्वप्नील लोखंडे, प्रमोद कदम यांना दोन्ही आरोपी हे रावेत परिसरात येणार असल्याची खात्रेशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून २४ लाख ६८ हजारांचे ६० तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने, गुन्हे पोलिस निरीक्षक सतीश पाटील, घाडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तात्या शिंदे, शिमोन चांदेकर, वंदू गिरे, दीपक साबळे, स्वप्नील खेतले याच्या टीम ने केली आहे.