महिलेचा पाठलाग करुन तिचे लपून छायाचित्र काढणे एका गुप्तचर संस्थेतील कर्मचाऱ्यांना अंगलट आले. महिलेने पाठलाग होत असल्याची तक्रार पुणे पोलिसांच्या महिला सहाय कक्षात दिल्यानंतर साध्या वेशातील पाळत ठेवून दोघांना पकडले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>सामायिक प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळपत्रक जाहीर; ‘एमएचटी’-‘सीईटी’९ ते २० मे दरम्यान

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
without btech or engineering diploma degree you can do these technical jobs see list an salary
BTech इंजिनिअरिंग पदवी न घेता करू शकता टेक्निकल क्षेत्रातील ‘या’ नोकऱ्या, कोर्स अन् पगाराबाबत घ्या जाणून
non marathi mobile phone professionals
अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा
student preparing for JEE exam
झोपण्यासाठी फक्त ४ तास, JEE परिक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्याचे वेळापत्रक पाहून जेईईच्या उमेदवारांना धक्का बसेल

निलेश लक्ष्मणसिंग परदेशी (वय २५, रा. वडगाव मावळ), राहुल गुणवंतराव बिरादार (वय ३०, रा. देहूगाव, ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. निलेश परदेशी याची खासगी गुप्तचर संस्था असून बिरादर सहायक आहे. याबाबत कोरेगाव पार्क भागातील एका ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचा गेल्या महिन्यात १ डिसेंबरपासून पाठलाग सुरू होता. आपला कोणीतरी पाठलाग करते, याचा संशय महिलेला होता. महिलेचे छायाचित्र काढून कोणाला तरी पाठविण्यात आल्याचा संशय महिलेला होता. समाजमाध्यमावर आपले छायाचित्र प्रसारित करुन गैरवापर होण्याची भीती महिलेला वाटत होती. त्यामुळे महिलेने पुणे पोलिसांच्या महिला सहाय कक्षात तक्रार दिली होती. महिलेने गुन्हे शाखेतील सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांची भेट घेतली होती.

हेही वाचा >>>पुणे : शिक्षक भरतीसाठी डीटीएड, बीएड स्टुडंट्स असोसिएशनतर्फे पुण्यात उपोषण सुरू 

त्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी पाळत ठेवणाऱ्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वी महिला कोरेगाव पार्क भागातील एका हाॅटेलमध्ये गेली होती. त्या वेळी परदेशी आणि बिरादार महिलेवर पाळत ठेवून थांबले होते. दोघे जण तिचे लांबून तिचे छायाचित्र काढत होते. साध्या वेशातील पोलिसांनी दोघांच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. परदेशी आणि बिरदार यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघे जण एका गुप्तचर संस्थेसाठी काम करत असल्याचे उघड झाले. महिलेचा पाठलाग करुन तिची महिती काढण्याचे काम कोणी दिले, याची माहिती दोघांनी पोलिसांना दिली नसून सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.