कोंढवा भागात अमली पदार्थ, विक्री प्रकरणी दोघांना पकडले

गुन्हे शाखेची कारवाई; कोकेनसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

drug peddlers arrested
( संग्रहित छायचित्र )

पुणे : कोकेन विक्री करणाऱ्या टांझानियातील दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विक्री प्रकरणी अटक केली. त्यांच्याकडून कोकेन, दुचाकी, इलेक्ट्रॅानिक वजनकाटा असा पाच लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अब्दुला रमदानी अब्दुला (वय ४६), रजाबू हरेरे सल्लेह (वय ४७, दोघे सध्या रा. उंड्री, मूळ रा. टांझानिया) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अब्दुला याच्या विरोधात अमली पदार्थ विक्री प्रकरणी मुंबईत गुन्हे दाखल आहेत. आरोपी सल्लेह वैद्यकीय व्हिसावर भारतात आला आहे. दोघेजण कोकेन विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. कोंढवा भागातील धर्मावत पेट्रोल पंपाजवळ सापळा लावून दोघांना पकडले.

पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, राहुल जोशी, विशाल दळवी, नितेश जाधव, योगेश मोहिते आदींनी ही कारवाई केली. दोघा आरोपींच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two drug peddlers arrested in kondhwa pune pune print news asj

Next Story
पुणे : कैवल्य वारी या भक्तिगीतांच्या अल्बमचे प्रकाशन
फोटो गॅलरी