सिंहगड रस्ता, कात्रज चौकातील पुलांचे उद्या भूमिपूजन

पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाला गती मिळणार आहे. या उड्डाणपुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या उड्डाणपुलामुळे खडकवासल्यापर्यंत जाणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार असून गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार आहे. दरम्यान, या उड्डाणपुलाबरोबरच कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी होणार आहे.

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही

सिंहगड रस्ता उड्डाणपुलाच्या कामासाठी यापूर्वी दोन वेळा पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले होते. तांत्रिक छाननी समितीनेही त्याला मान्यता दिली होती. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र करोना संसर्गामुळे निविदा प्रक्रियांना प्रतिसाद मिळाला नाही. मुदतवाढीनंतर चढ्या दराने निविदा आल्याने त्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जून महिन्यात उड्डाणपुलासाठी १३५ कोटींची तरतूद महापालिके ने मंजूर के ली होती. त्यानंतर निविदा प्रक्रियेला मान्यता मिळाल्यानंतरही काम रखडले होते.  मात्र आता प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कामासाठी आवश्यकतेनुसार आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली जाणार आहे. सिंहगड रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपुलाची लांबी एकू ण २.५ किलोमीटर एवढी आहे. दोन टप्प्यात उड्डाणपूल उभारण्यात येणार असून स्वारगेटहून वडगांव धायरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना कु ठेही न थांबता थेट फनटाइम चित्रपटगृहापर्यंत जाता येणार आहे. तसेच वडगांव धायरीहून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. महापालिके च्या प्रकल्प विभागाच्या आर्थिक आराखड्यानुसार उड्डाणपुलासाठी १३५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

२.७४ किलोमीटर अंतरात थेट वाहतूक

या रस्त्यावरून दररोज १ लाख २५ हजार वाहने ये-जा करतात, असे सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चार पर्यायी नकाशे तयार करण्यात आले होते. त्यापैकी स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी राजाराम पूल चौकात ४९५ मीटर लांबीचा आणि सिंहगडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृहापर्यंत २ हजार १२० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. दुहेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी १६.३ मीटर आणि एके री वाहतुकीसाठी पुलाची रुंदी ८.१५० मीटर एवढी आहे. भविष्यकाळात मेट्रो मार्गिके चा विचार करून आवश्यक ती जागा ठेवण्यात येणार आहे. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे २.७४ किलमीटर अंतराची वाहतूक थेट होणार आहे.

कात्रज चौकातील कामाला गती

कात्रज-कोंढवा सहा पदरी रस्त्याचे काम सुरू झाले आहे. या अंतर्गत वंडरसिटी येथून राजीव गांधी प्राणी संग्रहालय मार्गे राजस सोसायटीपर्यंत उड्डाणपूल करण्यात येणार आहे. या कामाचेही भूमिपूजनही शुक्रवारी नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. प्राणी संग्रहालयाच्या जागेत उड्डाणपुलाचे खांब उभारण्यात येणार आहेत.

उड्डाणपुलाची रचना

   विठ्ठलवाडी ते फनटाइन      चित्रपटगृह (वडगांव    धायरीकडे जाण्यासाठी)

  इंडियन ह्यूम पाइप ते भारत पेट्रोलियम-हिंगणे    (स्वारगेटकडे येण्यासाठी)

विठ्ठलवाडी ते बाजी     पासलकर उड्डाणपूल   (स्वारगेटकडे येण्यासाठी)