पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुली सुतारदरा भागातील एका गरीब कुटुंबातील आहेत. या मुलींचे आई-वडील कामासाठी बाहेर जाताना आपल्या साडे तीन आणि साडे चार वर्षांच्या दोन्ही मुलींना घरीच ठेऊन गेले होते.
घरात कोणी नसल्याचे पाहून त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या राहणार्या ६० वर्षांच्या नराधमाने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. घडलेला हा सर्व प्रकार या मुलींच्या आत्याच्या ५ वर्षांच्या मुलाने पहिला. मामा-मामी घरी आल्यानंतर त्याने ही बाब त्यांना सांगितली.
या घटनेबाबत पीडित मुलींच्या पालकांनी ६० वर्षीय आरोपी ज्येष्ठ नागरिकाला जाब विचारल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. या प्रकारानंतर पीडित मुलींच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली असून याप्रकरणी संबंधीत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.