व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणारे जेरबंद

व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या दोन गुंडांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले.

व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या दोन गुंडांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, तीन काडतुसे, बंदूक, तलवार अशी शस्त्रे जप्त करण्यात आली.

सुनील ऊर्फ चॉकलेट सुन्या किशोर बोकेफोडे (वय २९, रा. कांदे आळी, जनता वसाहत, पर्वती पायथा) आणि  प्रकाश ऊर्फ  पप्पू अरुण गायकवाड (वय २८, रा. बहुली, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.  बोकेफोडे आणि त्याचा साथीदार यांनी भारती विद्यापीठ, सिंहगड रस्ता, वारजे, उत्तमनगर येथील व्यापाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळली होती. त्यांच्या दहशतीमुळे तेथील व्यापाऱ्यांनी बंद पुकाराला होता. गेले वर्षभर दोघे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, हवालदार राजकिरण देशमुख आणि संजय काळोखे हे गस्त घालत होते. बहुलीतील खडकवाडी रस्त्यावर दोघे जण येणार असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे सापळा रचण्यात आला.

बोकेफोडे आणि गायकवाड यांच्याकडून दोन पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली. त्यानंतर गायकवाड याच्या घरात छापा टाकून पोलिसांनी सिंगल बोअरची बंदूक आणि एक तलवार जप्त केली. दोघा आरोपींविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, लूटमार असे गंभीर स्वरूपाचे बारा गुन्हे दाखल आहेत. अतिरिक्त आयुक्त सी.एच.वाकडे, उपायुक्त सुधीर साकोरे, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सहायक निरीक्षक विठ्ठल शेलार, राजनारायण देशमुख, संजय काळोखे, प्रमोद मगर, प्रशांत पवार, गणेश माळी, रमेश गरुड, सचिन अहिवळे, नागनाथ गवळी, धीरज भोर, बबन बोऱ्हाडे, सिद्धार्थ लोखंडे, चंद्रकांत सावंत यांनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two men arrested for threatening treders for ransom

Next Story
अकरावीला पसंतीचे महाविद्यालय मिळवण्याची एकच संधी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी