Premium

लोणावळा रेल्वे स्थानक परिसरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन अत्याचार

लोणावळा रेल्वे स्थानक परिसरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

crime
लोणावळा रेल्वे स्थानक परिसरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन अत्याचार( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

लोणावळा : लोणावळा रेल्वे स्थानक परिसरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन स्वतंत्र गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकणी नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचे दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अपहरण केले. हनुमान टेकडी परिसरातील एका घरात मुलीला डांबून ठेवण्यात आले. मुलीला साखळीने बांधून ठेवण्यात आले, तसेच तिला मारहाण करण्यात आली. आरोपींनी तिच्यावर अत्याचार केल्याची फिर्याद पीडित मुलीच्या आईने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, बेताब आनंद पवार, मंदा बेताब पवार, संजना बबलू पवार, बबलू पवार, अर्चना बेताब पवार, किरण बेताब पवार, मोनिका बेताब पवार, राज सिद्धेश्वर शिंदे, करीना राज शिंदे (सर्व रा. क्रांतीनगर, हनुमान टेकडी, लोणावळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>“शरद पवार कधी कुणाशी युती करतील सांगता येत नाही”, शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

लोणावळा शहर परिसरात घडलेल्या आणखी एका घटनेत उत्तरप्रदेशातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात थांबली हाेती. त्यावेळी तिला पळवून नेण्यात आले. तिला मारहाण करुन अत्याचार करण्यात आले. तिचा मोबाइल संच आरोपींनी ताब्यात घेतला. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार करीना राज शिंदे, मंदाकिनी बेताब पवार, संजना बबलू ठाकूर, बबलू पवार, राज सिद्धेश्वर पवार, बेताब आनंद पवार, ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा उपविभागाचे विभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सीताराम डुबल तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two minor girls kidnapped and tortured from lonavala railway station area pune print news rbk 25 amy

First published on: 24-09-2023 at 19:03 IST
Next Story
साडेपाच कोटींची फसवणूक; भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांच्यासह मुलाविरुद्ध गुन्हा