पुणे: बाल सुधारगृहातून पसार झालेली कोयता गँगमधील दोन अल्पवयीन मुले ताब्यात; पाच जण अद्याप फरार | Two minors of the Koyta gang who escaped from the juvenile reformatory are in custody pune print news rbk 25 amy 95 | Loksatta

पुणे: बाल सुधारगृहातून पसार झालेली कोयता गँगमधील दोन अल्पवयीन मुले ताब्यात; पाच जण अद्याप फरार

येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र संचलित बाल सुधारगृहातून पसार झालेल्या कोयता गँगमधील दोन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.

banished accused arrested Thane
बाल सुधारगृहातून पसार झालेली कोयता गँगमधील दोन अल्पवयीन मुले ताब्यात(प्रातिनिधिक छायाचित्र)

येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र संचलित बाल सुधारगृहातून पसार झालेल्या कोयता गँगमधील दोन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.येरवड्यातील बाल सुधारगृहातून कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले पसार झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता.

हेही वाचा >>>पोटनिवडणुकीसाठी आघाडीत एकीचे प्रयत्न; कसबा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरात बाल सुधारगृहातून पसार झालेली दोन अल्पवयीन मुले येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस हवालदार नामदेव रेणुसे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी करुन गुन्हे शाखेने येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक निरीक्षक वैशाली भोसले, नामदेव रेणुसे, उत्तम तारु, प्रमोद कोकणे, गणेश थोरात, नागनाथ राख आदींनी ही कारवाई केली.


मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 10:15 IST
Next Story
पुण्यात भवानी पेठेतील वाड्याला आग; ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू