पुणे : पूर्व विदर्भ आणि तेलंगणावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. मात्र, पुढील दोन दिवस विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि तेलंगणावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रताही कमी होत आहे. वातावरणाच्या खालच्या स्तरातील वाऱ्याची द्रोणिक रेषा उत्तर गुजरात ते केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे. या हवामानविषयक प्रणालीचा परिणाम म्हणून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा – पिंपरी : पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास नकार देणार्या महापालिका कर्मचार्यावर गुन्हा
हेही वाचा – राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर… यंदा किती शिक्षक ठरले मानकरी?
विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, सातारा आणि पुणे जिल्ह्याला पिवळा इशारा दिला असून, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.