scorecardresearch

सांगली रेल्वे स्थानकावर आणखी दोन गाड्या थांबणार

सांगली रेल्वे स्थानकावर बंगळुरू-जोधपूर-बंगळुरू आणि उदयपूर-म्हैसूर-उदयपूर या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.

Railway-Train-Journey
सांगली रेल्वे स्थानकावर आणखी दोन गाड्या थांबणार (संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता

पुणे : सांगली रेल्वे स्थानकावर बंगळुरू-जोधपूर-बंगळुरू आणि उदयपूर-म्हैसूर-उदयपूर या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. हा थांबा सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आला आहे.

बंगळुरूमधून सुटणारी बंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेस गाडी ९ एप्रिलपासून सांगली स्थानकावर दुपारी १ वाजून ७ मिनिटांनी पोहोचेल आणि १ वाजून १० मिनिटांनी पुढे रवाना होईल. जोधपूरहून सुटणारी जोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेस १२ एप्रिलपासून सांगली स्थानकावर सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी पोहोचेल आणि ७ वाजता पुढे रवाना होईल.

उदयपूरहून सुटणारी उदयपूर-म्हैसूर हमसफर एक्स्प्रेस १० एप्रिलपासून सांगली स्थानकावर रात्री १० वाजून ३३ मिनिटांनी पोहोचेल आणि १० वाजून ३५ मिनिटांनी पुढे रवाना होईल. म्हैसूरहून सुटणारी म्हैसूर-उदयपूर हमसफर एक्स्प्रेस १३ एप्रिलपासून सांगली स्थानकावर दुपारी २ वाजून ३८ मिनिटांनी पोहोचेल आणि २ वाजून ४० मिनिटांनी पुढे रवाना होईल, असे रेल्वेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 22:33 IST

संबंधित बातम्या