परदेशात वाढत असलेल्या बीए.७ रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून राज्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळांवर ४४,६६६ प्रवासी आले असून त्यांपैकी ७०३ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीतून दोन प्रवाशांना करोना संसर्गाचे निदान झाले असून दोघांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आले आहेत. एक प्रवासी पुणे आणि एक गोव्याचा रहिवासी आहे.

हेही वाचा >>>पुणे: संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी प्रशासनाची तयारी;रुग्णालयांतील प्राणवायू, खाटा,पायाभूत सुविधांची तपासणी

Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
survey of disabled in maharashtra,
राज्यात अपंगांच्या सर्वेक्षणाला तीस वर्षांनंतर मिळाला मुहूर्त
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ

राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी याबाबत माहिती दिली. चीन, अमेरिका, ब्राझील, फ्रान्स या देशांतील वाढत्या बीएफ.७ रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या सर्वेक्षणाचा हा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणाचा भाग म्हणून देशात दाखल होणाऱ्या प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी तर इतरांची केवळ लक्षण तपासणी (थर्मल स्क्रीनिंग) करण्यात येणार आहे.