scorecardresearch

पुणे : हडपसर भागात भरधाव ट्रकच्या धडकेने दोघांचा मृत्यू, अपघातानंतर ट्रक चालक पसार

अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

people died hit by truck Hadapsar
हडपसर भागात भरधाव ट्रकच्या धडकेने दोघांचा मृत्यू (प्रातिनिधिक छायाचित्र)

हडपसर भागात भरधाव ट्रकच्या धडकेने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – Pimpri-Chinchwad : “आमच्याकडे ज्यांनी उमेदवारी मागितली होती, त्यांनी शांत रहावं म्हणून…” अजित पवारांचं विधान!

हेही वाचा – शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल कलाटेंची राष्ट्रवादीकडून मनधरणी! म्हणाले हातात हात घालून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करू

संतोष शिवाजी हरपळे (वय ३७), लक्ष्मण अण्णासाहेब पाटील (वय ३५, दोघे रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याबाबत गणेश चोरघडे (वय ३७, रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांनी हडपसर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष आणि लक्ष्मण फुरसुंगीतील जुन्या कालव्याजवळ असलेल्या रस्त्यावर थांबले होते. त्या वेळी भरधाव ट्रकने दोघांना धडक दिली. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 15:02 IST
ताज्या बातम्या