scorecardresearch

पुणे : शाळेतील विद्यार्थिनींची फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

पिंपरी- चिंचवड शहरातील एका विद्यालयातील विद्यार्थिनींमध्ये किरकोळ वादावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली

पुणे : शाळेतील विद्यार्थिनींची फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
शाळेतील विद्यार्थिनींची फ्री स्टाईल हाणामारी

पालकांनी आपली मुले काय करतात याकडे लक्ष देण्याची गरज

पिंपरी- चिंचवड शहरात दोन विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ पिंपरीतील असल्याचे समोर आले आहे. दोन्ही विद्यार्थिनींची हाणामारी सोडवण्यासाठी दोन महिला पुढे येतात. परंतु, त्यांना न जुमानता एकमेकांचे केस ओढून विद्यार्थीनी हाणामारी केली आहे. 

हेही वाचा >>> पुणे : थंडीचा जोर ओसरणार; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

पिंपरी- चिंचवड शहरातील एका विद्यालयातील विद्यार्थिनींमध्ये किरकोळ वादावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली. विद्यालयाच्या परिसरातच घडलेल्या या घटनेमुळे अनेक विद्यार्थी तिथे गोळा झाले होते. काही महिलांनी दोन्ही विद्यार्थिनींचे हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. अक्षरशः एकमेकींना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना वीस तारखेला घडली असून आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात दोघी जणी एका विद्यार्थीला मारत असल्याचे दिसत आहे. हे दोन्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे असून वेळीच समज देणे महत्वाचे आहे. अस या व्हिडिओ वरून तरी अधोरेखित होत आहे. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 22:33 IST

संबंधित बातम्या