पुणे: पुण्यात तडीपार गुंडांचा वावर; दोन गुन्हेगार अटकेत, पिस्तुलासह तीक्ष्ण शस्त्रे जप्त | Two Tadipar gangsters arrested in Pune print news amy 95 | Loksatta

पुणे: पुण्यात तडीपार गुंडांचा वावर; दोन गुन्हेगार अटकेत, पिस्तुलासह तीक्ष्ण शस्त्रे जप्त

शहरातून तडीपार केल्यांतर पिस्तूल घेऊन वावरणाऱ्या गुंडाला गुन्हे शाखेने सिंहगड रस्ता भागात पकडले.

पुणे: पुण्यात तडीपार गुंडांचा वावर; दोन गुन्हेगार अटकेत, पिस्तुलासह तीक्ष्ण शस्त्रे जप्त
तडीपार केल्यानंतर पिस्तूल घेऊन वावरणाऱ्या गुंडाला गुन्हे शाखेने सिंहगड रस्ता भागात पकडले(प्रातिनिधिक छायाचित्र )

शहरातून तडीपार केल्यानंतर पिस्तूल घेऊन वावरणाऱ्या गुंडाला गुन्हे शाखेने सिंहगड रस्ता भागात पकडले. गुंडाकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. मुंढवा भागात तडीपार गुंडाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे.
अजय शंकर सुतार (वय २०, रा. श्रीनिवास अपार्टमेंट, नऱ्हे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सुतार याला शहरातून तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीचा आदेश भंग करुन तो शहरात आला होता. सिंहगड रस्ता भागातील वडगाव उड्डाणपुलाजवळ तो थांबला होता. त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विराेधी पथकाला मिळाली.

हेही वाचा >>>पुणे: पीएच.डी. संशोधन केंद्रांतील गैरप्रकारांना चाप?

पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले.पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक शाहिद शेख, बाळू गायकवाड, गणेश ढगे, रवींद्र लोखंडे आदींनी ही कारवाई केली.दरम्यान, मुंढवा भागात तडीपार केलेल्या गुंडाला पकडण्यात आले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. सागर शंकर घोडके (वय २२, रा. कीर्तनेबाग, केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

हेही वाचा >>>पुणे: एसटी बसच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू; सोलापूर रस्त्यावर अपघात

घोडकेला तडीपार करण्यात आले होते. तो मगरपट्टा सिटी भागात थांबला होता. पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहायक निरीक्षक संदीप जाेरे, दिनेश राणे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे यांनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 15:41 IST
Next Story
पुणे: एसटी बसच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू; सोलापूर रस्त्यावर अपघात