scorecardresearch

Premium

पिंपरीत ‘पंतप्रधान आवास’च्या दोन हजार सदनिका… इच्छुक अर्जांच्या छाननीसाठी अडीच कोटींची उधळण?

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आकुर्डी, पिंपरी आणि डुडुळगाव येथे उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पांतील सदनिकेसाठी प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी करण्यासाठी दोन कोटी ३७ लाख ५० हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

Prime-Ministers-Residence-scheme
आकुर्डी (मोहननगर) मधील सहा इमारतींमध्ये ५६८, पिंपरी (उद्यमनगर) मधील दोन इमारतींमध्ये ३७० सदनिका आहेत.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी, पिंपरी आणि डुडुळगाव येथे उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पांतील सदनिकेसाठी प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी करण्यासाठी दोन कोटी ३७ लाख ५० हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. पाणीपुरवठ्याच्या देयकांचे काम करणाऱ्या कॅनबेरी अनॉलिटिक्स संस्थेला थेट पद्धतीने काम देण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

मुंबई : रस्ते फर्निचर कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया?लोकायुक्तांकडे सुनावणी सुरू असताना २११ कोटींचा नवा प्रस्ताव
unique information, exhibition hall, State Excise Department
१८३९ नंतर मद्यपान करण्यासाठी १८ वर्षे वयोमर्यादा जगभरात लागू! नव्या राज्य उत्पादन शुल्क भवनातील खास दालनातील माहिती
Uttarakhand Violence
उत्तराखंडमध्ये हिंसाचार, वडील-मुलासह सहा जणांचा मृत्यू, १५० पोलिसांसह २५० जण जखमी, देवभूमीत नेमकं काय घडतंय?
objectionable tapes
गडचिरोली : ‘हनीट्रॅप’ प्रकरणात आक्षेपार्ह चित्रफीत पोलिसांच्या हाती, पत्रकाराच्या…

आकुर्डी (मोहननगर) मधील सहा इमारतींमध्ये ५६८, पिंपरी (उद्यमनगर) मधील दोन इमारतींमध्ये ३७० सदनिका आहेत. तर, डुडुळगाव येथील पाच इमारतींमध्ये एक हजार १९० सदनिका उभारण्यात येणार आहेत. या तीन प्रकल्पांत दोन हजार १२८ सदनिका आहेत.मोहननगर व उद्यमनगर येथील गृहप्रकल्पांसाठी २७ ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. डुडुळगाव गृहप्रकल्पाचे बांधकाम नुकतेच सुरू झाले आहे. त्यासाठी अर्ज स्वीकारण्यात आलेले नाहीत.

आणखी वाचा-अकरावीत प्रवेशापासून वंचित असलेले आणि दहावीमध्ये ‘एटीकेटी’ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता शेवटची संधी…

लाभार्थी निश्चित करण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करणे, पात्र-अपात्र ठरविणे, सोडत काढणे, सोडत काढल्यानंतर कर्जासाठी ना-हरकत प्रमाणपत्र, ताबा पत्र देणे आदी कामकाज संगणक प्रणालीद्वारे करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी २० जून २०२३ रोजी मान्यता दिली आहे. त्यासाठी अशा प्रकारचे कामकाज करण्याकरिता एजन्सीची नेमणूक करणे आवश्यक आहे. कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता हे काम महापालिकेने थेट पद्धतीने कॅनबेरी अनॉलिटिक्स या खासगी संस्थेला दिले आहे.

या संस्थेमार्फत झोपडपट्टी सर्व्हे करणे, चऱ्होली, रावेत, बोऱ्हाडेवाडीतील प्रकल्पांची सोडतीनंतरची कामे चालू आहेत. पाणीपुरवठा विभागाची देयके वाटपाचे काम संस्था ११ वर्षांपासून करत आहे. त्यामुळे सदनिकेकरिता लाभार्थी निश्चित करण्याचे काम या संस्थेला थेटपद्धतीने देण्याचा प्रस्ताव झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्यास आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली असून दोन कोटी ३७ लाख ५० हजारांचा खर्च येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two thousand flats of prime ministers residence in pimpri two and half crores waste on scrutiny of applications pune print news ggy 03 mrj

First published on: 17-09-2023 at 13:47 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×