scorecardresearch

स्तनांच्या कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी एकाच छताखाली दोन हजार महिला..!

सिमरन जेठवानी म्हणाल्या, स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती होतानाच दोन विश्वविक्रम झाले आहेत.

स्तनांच्या कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी एकाच छताखाली दोन हजार महिला..!
१९५६ महिलांनी नेलपॉलिश लावून, तर १९१९ महिलांनी स्तनांच्या कर्करोगावरील मार्गदर्शनपर कार्यक्रमाला उपस्थिती लावून या विश्वविक्रमामध्ये सहभाग घेतला.

कार्यक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद

दोन हजार महिलांनी एकाच छताखाली येऊन स्तनाच्या कर्करोगाविषयी समजून घेण्याच्या आणि स्तनाच्या कर्करोगाचे प्रतीक असलेल्या गुलाबी रंगाची नेलपॉलिश कमीत कमी वेळेत लावण्याच्या पुण्यात झालेल्या कार्यक्रमाची रविवारी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

ओवायई (ओपन युअर आईज) फाउंडेशनतर्फे प्रशांती कॅन्सर केअर मिशन आणि पॉलिकॅब केबल्सच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १९५६ महिलांनी नेलपॉलिश लावून, तर १९१९ महिलांनी स्तनांच्या कर्करोगावरील मार्गदर्शनपर कार्यक्रमाला उपस्थिती लावून या विश्वविक्रमामध्ये सहभाग घेतला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निरीक्षण अधिकारी लुसिया सिनीगॅग्लियसी यांनी या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र ओवायई फाउंडेशनकडे सुपूर्त केले. या वेळी प्रशांती कॅन्सर सेंटरच्या लालेह बुशेरी, फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सिमरन जेठवानी, आंतरराष्ट्रीय संचालिका लीला पुनावाला, उपाध्यक्षा जानकी मल्होत्रा, सचिव रेश्मा सराफ, सहसचिव लतिका साकला, खजिनदार श्वेता पाटील, सपना छाजेड उपस्थित होत्या. जगप्रसिद्ध स्तन कर्करोग तज्ज्ञ डॉ. चैतन्यानंद कोप्पीकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

डॉ. चैतन्यानंद कोप्पीकर म्हणाले, स्तनाचा कर्करोग हा पूर्णपणे बरा होणारा कर्करोग आहे. वेळीच तपासण्या केल्या आणि योग्य उपचार केले, तर या आजारातून आपली सुटका होऊ  शकते. या आजाराचे निदान झाल्यास घाबरून किंवा नैराश्यात न जात योग्य उपचार घ्यावेत. कुटुंबीयांनी अशा व्यक्तींना आधार दिला तर कर्करोगामुळे येणाऱ्या नैराश्यातून लवकर बाहेर पडणे शक्य होते. सिमरन जेठवानी म्हणाल्या, स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती होतानाच दोन विश्वविक्रम झाले आहेत. शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, संस्था आणि विविध गटांतील महिला या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या. दोन हजारपेक्षा अधिक महिलांनी यात सहभाग घेतला. जगप्रसिद्ध स्तन कर्करोग तज्ज्ञ डॉ. चैतन्यानंद कोप्पीकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

स्तनांच्या कर्करोगातून बऱ्या झालेल्या पाच महिलांनी यावेळी अनुभव कथन केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या