पुणे : बोपदेव घाटात दुचाकीस्वार दाम्पत्याला लुटले

दुचाकीस्वार दाम्पत्याला मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात घडली.

crime
(सांकेतिक फोटो)

दुचाकीस्वार दाम्पत्याला मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात घडली. चोरट्यांनी दुचाकीस्वाराच्या डोक्यात तलवारीने वार केले. त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले.

याबाबत बाळू बबन जाधव (वय ४२, रा. कात्रज) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव मूळचे सासवडचे आहेत. ते शहरात नोकरी करत असून त्यांनी कात्रज भागात सदनिका भाडेतत्वावर घेतली होती. जाधव दाम्पत्य दुचाकीवरुन सासवडला जात होते. रात्री साडेदहाच्या सुमारास के. जे. महाविद्यालायाजवळ दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी जाधव दाम्पत्याला अडवले आणि त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी त्यांना तलवारीचा धाक दाखविला. जाधव यांच्या डोक्यात तलवारीने वार करुन त्यांचा मोबाईल हिसकावला. त्यानंतर जाधव यांच्या पत्नीस धमकावून चोरट्यांनी ६० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले.

चोरटे अंधारात पसार झाले. जाधव दाम्पत्याने घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना या घटनेची माहिती दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two wheeler couple robbed in bopadev ghat pune print news amy

Next Story
पुणे : दांडेकर पूल परिसरात तरुणावर शस्त्राने वार खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघे अटकेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी