scorecardresearch

पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू; पुणे-सातारा रस्त्यावर अपघात

पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील विवेकानंद पुतळा परिसरात घडली.

पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू; पुणे-सातारा रस्त्यावर अपघात

पुणे : पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील विवेकानंद पुतळा परिसरात घडली.

सिद्धराम अडेवप्पा कुंभार (वय ४२, रा. कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी रात्री उशीरा पीएमपी बस चालका विरोधात सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सिद्धराम एका ठेकेदाराकडे कामाला होते. पद्मावती चौकातून दुपारी ते दुचाकीवरून स्वारगेटकडून कात्रजकडे निघाले होते.

त्या वेळी विवेवकानंद पुतळ्याजवळ पीएमपी बसने दुचाकीस्वार सिद्धराम यांना धडक दिली. ते रस्त्यावर पडले. चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-06-2022 at 21:00 IST

संबंधित बातम्या