पुणे : पतीच्या छळामुळे वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी कोढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले.

लोहगाव भागातील संतनगर परिसरात एका महिलेने पतीच्या छळामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नयना प्रकाश माघाडे (वय २६, रा. विठ्ठल निवास, संतनगर, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती प्रकाश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नयना यांचे भाऊ जय खरात (वय २८, रा. निंबगाव जाळी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नयना यांचा आरोपी प्रकाश याच्याशी चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर प्रकाशने नयना यांचा छळ सुरू केला. माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. पतीच्या छळामुळे नयना यांनी पंख्याला गळफास घेऊन नुकतीच आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – विचार करण्याची हीच ती वेळ…

हेही वाचा – सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार

कोंढवा भागात पतीच्या छळामुळे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. अश्विनी राहुल माने (वय ३६, रा. कासट काॅलनी, साईनगर, कोंढवा बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती राहुल याच्यासह नातेवाईक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत अश्विनी यांच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अश्विनीचा पती राहुल तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. तिला त्याने मारहाण केली होती. छळामुळे तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तपास करत आहेत.

Story img Loader