विजेचा धक्का लागून दोन कामगारांचा मृत्यू

लक्ष्मी रस्त्यावरील व्होरा डायमंड शॉपमध्ये अंतर्गत सजावटीचे काम करताना विजेचा झटका बसून दोन कामगारांचा मृत्यू झाला. शगुन चौकातील दुल्हन कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

लक्ष्मी रस्त्यावरील व्होरा डायमंड शॉपमध्ये अंतर्गत सजावटीचे काम करताना विजेचा झटका बसून दोन कामगारांचा मृत्यू झाला. शगुन चौकातील दुल्हन कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सल्लाउद्दीन समशुद्दीन शेख (वय ४१), अरुण वैकुंठराणा शर्मा (वय ३१, रा. लक्ष्मी फर्निचर होमरिन, स्टेशन रस्ता, विक्रोळी, मुंबई) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.                                                                                                           पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शगुन चौकातील दुल्हन कॉम्प्लेक्समध्ये व्होरा डायमंड दुकान आहे. या ठिकाणी दोघे जण सजावटीचे काम करत होते. त्या वेळी त्यांना विजेचा झटका बसल्याने दोघेही दहा ते बारा फूट उंचीवरून खाली पडले. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला आणि कपाळाला चांगला मार बसला. त्यांना तत्काळ उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन सकुंडे घटनास्थळी पोहचले. शेख आणि शर्मा यांचा मृत्यू शॉक लागल्यामुळे किंवा उंचावरून पडल्यामुळे झाला, हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील हे अधिक तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two workers died due to electric shock