मासेमारी करण्यासाठी गेलेले दोन तरूण बुडाले

अमीन लतीफ कुरेशी आणि दीपक शिंदे ( दोघे रा. येरवडा) अशी बुडालेल्या तरूणांची नावे आहेत.

वडगांव शिंदे येथील घटना
वडगांव शिंदे येथे नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेले येरवडा भागातील दोन तरूण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. अग्निशामक दलाच्या जवानांकडून त्यांचा शोध घेण्यात आला, मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.
अमीन लतीफ कुरेशी आणि दीपक शिंदे ( दोघे रा. येरवडा) अशी बुडालेल्या तरूणांची नावे आहेत. लोहगांवनजीक असलेल्या वडगांव शिंदे गावातून इंद्रायणी नदी वाहते. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. रविवारी दुपारी कुरेशी आणि शिंदे वडगांव शिंदे येथे मासेमारी करण्यासाठी गेले होते. दोघे जण मासेमारी करण्यासाठी पाण्यात उतरले, मात्र पाण्याला वेग असल्याने दोघे जण बुडाले. स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने त्यांनी अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली.
जवानांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. पाण्याला वेग जास्त असल्याने त्यांचा शोध घेण्यात अडचणी आल्या. दोघे जण वाहून गेल्याची शक्यता अग्निशामक दलाने व्यक्त केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two young death after drowned into river during fishing

ताज्या बातम्या