scorecardresearch

Premium

पुणे : ‘यूजीसी’कडून १९ अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन, दूरस्थ पद्धतीने प्रवेशास मनाई

यूजीसीकडून देशभरातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांना ऑनलाइन माध्यमासह मुक्त व दूरस्थ पद्धतीने विविध अभ्यासक्रमांना परवानगी दिली जाते.

ugc bans online distance mode admission
(संग्रहित छायाचित्र)

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) १९ अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन किंवा दूरस्थ पद्धतीने प्रवेशास मनाई केली आहे. तसेच ऑनलाइन आणि दूरस्थ अभ्यासक्रमांच्या मान्यतेची खात्री करूनच पुढील प्रक्रिया करण्याबाबत स्पष्ट केले आहे. यूजीसीकडून देशभरातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांना ऑनलाइन माध्यमासह मुक्त व दूरस्थ पद्धतीने विविध अभ्यासक्रमांना परवानगी दिली जाते. पण अनेक संस्था मान्यतेविनाच अभ्यासक्रम राबवत असल्याचे समोर आले आहे. अभ्यासक्रमांच्या मान्यतेची खात्री न केल्याने विद्यार्थ्यांची फसवणूक होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक प्रवेश घेण्याच्या स्पष्ट सूचना यूजीसीने परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

हेही वाचा >>> आखाती देशात पुण्यातील महिलांची विक्री प्रकरण : मुख्य दलालाला मुंबईतील माहिममधून अटक

Yashwantrao Chavan Maharashtra Open University
मुक्त विद्यापीठाला चार महिन्यात १६२ कोटीचा विक्रमी महसूल; अनेक नव्या अभ्यासक्रमांना मान्यता
Scholarship applications pending colleges Government Medical College, Engineering chandrapur
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकीसह अनेक महाविद्यालयांकडे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित; सामाजिक न्याय विभागाचे…
Gondwana University Result
गोंडवाना विद्यापीठाचा निकाल धक्कादायक! ७४ हजार विद्यार्थ्यांपैकी ५२ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण
students study abroad
दहा लाखांवर विद्यार्थी शिक्षणासाठी विदेशात, ‘या’ पाच देशांना सर्वाधिक पसंती

यूजीसीने दिलेल्या सूचनांनुसार, उच्च शिक्षण संस्थांना दूरस्थ अभ्यासक्रम, ऑनलाइन अभ्यासक्रमांची मान्यता विद्यार्थ्यांनी तपासावी. यूजीसीसह संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावर त्याची माहिती पाहावी. याबाबतची माहिती http://deb.ugc.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांची माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपूर्वीच दूरस्थ आणि ऑनलाइन अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश यूजीसीने दिले आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि इतर पॅरामेडिकल अभ्यासक्रम, औषध निर्माणशास्त्र, नर्सिंग, दंतवैद्यक, वास्तुकला, विधी, कृषी, उद्यानविद्या, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी, कलिनरी सायन्स, एअरक्राफ्ट मेंटेनन्स, व्हिज्युअल आर्ट्स अँड स्पोर्ट्स, ॲव्हिएशन. योगा ॲण्ड टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांशिवाय पीएचडी व एमफिल हे अभ्यासक्रमही ऑनलाइन किंवा दूरस्थ पद्धतीने करण्यास बंदी असल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ugc bans online distance mode admission for 19 courses pune print news ccp 14 zws

First published on: 21-09-2023 at 22:39 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×