पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (यूजीसी नेट) अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना ३० मेपर्यंत अर्ज भरता येईल. यूजीसीचे अध्यक्ष प्रा. जगदेशकुमार यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) यूजीसी नेट ही परीक्षा वर्षांतून दोन वेळा घेतली जाते. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे डिसेंबर २०२१ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे परीक्षांचे सत्र सातत्य कायम ठेवण्यासाठी डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ ची परीक्षा एकत्रितरीत्या घेतली जाणार आहे. उमेदवारांकडून मुदतवाढीची मागणी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अर्जासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी आता उमेदवारांसाठी ३० मे ही अंतिम मुदत असेल, असे प्रा. जगदेशकुमार यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. उमेदवारांना अधिक माहिती  ugcnet.nta.nic.in  या संकेतस्थळावर मिळेल.

pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
ST buses
एसटीच्या मार्गात आचारसंहितेचा अडथळा
neeraj chpra
ऑलिम्पिक ध्वजवाहकाच्या नियुक्तीवरून वाद कायम! शरथ कमलऐवजी नीरज चोप्राकडे जबाबदारी देण्याकडे वाढता कल
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल