१२ किलोमीटर लांबीपैकी १०.८ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : शिवाजीनगर (कृषी महाविद्यावलय)ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गिकेच्या एका बाजूच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. कृषी महाविद्यालय ते स्वारगेट हे अंतर सहा किलोमीटर एवढे असून या अंतरात दोन स्वतंत्र बोगद्यांची कामे हाती घेण्यात आली असून एकूण बारा किलोमीटर लांबीपैकी १०.८ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. मार्च अखेपर्यंत उर्वरीत १.२ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Underground metro line tunnel completed ysh
First published on: 15-01-2022 at 00:04 IST