पुणे शहराच्या प्रदूषणाबाबत विविध नेते बोलायला लागले आहेत. आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील हवा प्रदूषणावर भाष्य केले. पुणे हे खूप छान शहर होते. पुण्यात शुद्ध हवा होती. आता मात्र शहरात वाहतूक कोंडी असते. पुण्यातील हवा प्रदूषित आहे, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये खासगी कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा- पुणे: अभिनेत्री प्राजक्ता माळी, प्रियेशा देशमुख, रणजित काशिद, अमोल वाघमारे युवा पुरस्काराचे मानकरी
पुणे शहरातील वाहतूक कोंडीबाबत अनेकांनी भाष्य केलेलं आपण ऐकले आहे. वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पुणे वाहतूक पोलीस नेहमी करतात. परंतु, शहरात वाढणारी लोकसंख्या आणि वाहतुकीचे नियोजन करण्यात कमी पडत असलेली जागा यामुळे वाहतुकीचा प्रश्न जैसे थे च आहे. गडकरी म्हणाले की, माझी बहीण स्वारगेट या ठिकाणी राहात होती. त्यामुळे पुण्यात यायचो. तेव्हा, पुण्यात शुद्ध हवा असायची. आता हवा प्रदुषित झाली आहे. रस्त्यांवर वाहतूक कोंडी आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंगरोड बनवत आहे. असे नितीन गडकरी यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील पुण्यातील हवाप्रदूषणाचा विषय गंभीर असल्याचे म्हटले होते.