केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल शुक्रवारपासून (११ नोव्हेंबर) दोन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात सुकाणू समिती पदाधिकारी बैठक, कार्यकर्ता मेळावा, शेतकरी आणि महिला बचत गटांचा मेळावा ते घेणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघावर भारतीय जनता पक्षाने पक्षाने लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्यादृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी सीतारामन यांनी बारामतीचा दौरा केला होता. त्या पुन्हा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्य आठवड्यात बारामती दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने पूर्वतयारीसंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल बारामती दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली. संघटन सरचिटणीस ॲड. धमेंद्र खांडरे, जनार्धन दांडगे, प्रशांत कोतवाल यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे: ज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी देशाला महासत्ता घडवावे; इस्रोचे प्रमुख डॉ. सोमनाथ एस. यांचे मत

Eknath Shinde, Eknath Shinde kolhapur,
कडक उन्हात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्तिप्रदर्शन
narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यात बदल ?
vina vijayan ed case
मुख्यमंत्र्यांच्या मुलीवर ईडीची कारवाई; केरळमध्ये काय घडतंय?
chhatrapati sambhajinagar, central minister bhagwat karad
दीड वर्षे मेहनत करुन राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या पदरी निराशा

प्रल्हादसिंग पटेल यांचा बारामती दौरा खडकवासला विधानसभा मतदारसंघापासून सुरू होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत. त्यानंतर भोर मतदारसंघात दुपारी कार्यकर्ता मेळावा होणार असून पुरंदर विधानसभा मतदारसंघात शेतकरी आणि महिला बचत गटाचा मेळाव्याला प्रल्हादसिंग पटेल उपस्थित राहणार आहेत. बारामीत विधानसभा मतदारसंघात शाखा उद्घाटन, सहकारक्षेत्रातील तज्ञांबरोबर चर्चा होणार असून शनिवारी (१२ नोव्हेंबर) बारामती येथील शहर कार्यालयाला भेट, इंदापूर आणि दौंड येथे कार्यकर्ता मेळावा प्रल्हादसिंग पटेल घेणार आहेत, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले.