पिंपरी : गुंतागुतांची प्रसृती, नवजात बालकाच्या हृदयाचे ठोके कमी, हालचाल नसताना महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करुन सर्वसाधारण प्रसुती केली. आईला आणि बाळालाही जीवनदान दिले. तसेच पालकांशी पाठपुरावा करुन सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडून घेतले. मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून सुकन्या समुद्धी योजनेअंतर्गत मुलीचे बचत खाते सुरू करण्यात आले. त्यामध्ये डॉक्टरांनी मुलीच्या नावे सहा हजार रुपये देऊन बचतीचा श्रीगणेशा केला.

हेही वाचा >>> “अजित पवारांबरोबर गेलेले सर्व आमदार स्वगृही परतण्याच्या विचारात”, जयंत पाटलांचा मोठा दावा; म्हणाले, “काहीजण…”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

थेरगाव रुग्णालयात गौरी पवार ही २७ वर्षांची महिला प्रसुतीसाठी दाखल झाली होती. महिलेची प्रकृती गंभीर होती. महिलेची गर्भधारणेची चौथी वेळ होती. पूर्वी दोनवेळा गर्भपात झाला होता. बाळ पायाळू होते. गुतांगुतींची प्रसृती होती. त्यामुळे भीती होती. ‘सिजेरियन’साठी वेळ नसल्याने डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत भूलतज्ज्ञांच्या सहकार्याने सर्वसाधारण (नॉर्मल) प्रसुती केली. गोंडस मुलीचा जन्म झाला. प्रसुतीनंतर बाळाचे ठोके अतिशय कमी होते. हालचाल नव्हती. प्रकृती गंभीर होती. नवजात बालिकेला अतिदक्षता विभागात दाखल केले. हार मानायची नाही, या जिद्दीने बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिका-यांनी शर्तीचे प्रयत्न करुन बाळाला वाचविले. शर्तीच्या प्रयत्नानंतर बाळ रडले आणि डॉक्टरांच्या चेह-यावर समाधानाचे हसू उमटले.

हेही वाचा >>> पुणे: दावोस दौऱ्यात ३२ कोटींचा खर्च; उद्योगमंत्री सामंत यांची स्पष्टोक्ती

नवजात बालिकेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. मात्र, घरी सोडल्यानंतरही डॉक्टर सतत पालकांच्या संपर्कात राहून बाळाच्या प्रकृतीची माहिती घेत होते. सुकन्या समृद्धी योजनेची माहिती दिली. बाळाच्या नावाने पोस्टात खाते सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून डॉक्टरांनी आर्थिक मदत केली. त्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीता मनतोडे, भूलतज्ज्ञ डॉ. आदिती येलमार, बालरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा शिंदे यांनी प्रत्येकी दोन हजाराप्रमांणे सहा हजार रुपये बालिकेच्या सुकन्या समुद्धी योजनेच्या खात्यावर भरले. पैसे भरल्याची पावती बाळाच्या आईकडे नुकतीच सुपूर्द केली.

गुंतागुंतीची प्रसृती होती. सर्वसाधारण प्रसुती करण्यात आणि नवजात बाळाला वाचविण्यात यश आले. बालिकेचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेत पैसे टाकण्याचा आम्ही निर्णय घेतला. भविष्यात बालिकेला कधी मदत लागल्यास आम्ही मदत करणार आहोत. डॉ. नीता मनतोडे- स्त्रीरोग तज्ज्ञ थेरगाव रुग्णालय

Story img Loader