आर्य संगीत प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवादरम्यान होणाऱ्या ‘षड्ज’ आणि ’अंतरंग’ उपक्रमात दिवंगत कलाकारांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. तर, महोत्सवामध्ये ’शताब्दी स्मरण’ या अनोख्या प्रदर्शनामध्ये स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांची दुर्मीळ छायाचित्रे रसिकांना पाहता येणार आहेत.

हेही वाचा- पुणे: सांगवीतील रोजगार मेळाव्यात ११०० जणांना जागेवर नियुक्तीपत्रे

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल येथे १४ ते १८ डिसेंबर दरम्यान सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाला जोडून सवाई गंधर्व स्मारक येथे  १४ डिसेंबरपासून तीन दिवस सकाळी अकरा वाजता षड्ज व अंतरंग हे कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवादरम्यान दरवर्षी आयोजित करण्यात येणारे ‘शताब्दी स्मरण’ हे चित्रप्रदर्शन देखील या वेळी वैशिष्ट्यपूर्ण असेल, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सोमवारी दिली.

उपक्रमामध्ये १४ डिसेंबर रोजी संगीतमार्तंड पं. जसराज यांची मुलगी दुर्गा जसराज आणि त्यांचे भाचे व शिष्य पं. रतन मोहन शर्मा हे पं. जसराज यांच्या आठवणींना उजाळा देतील. दुसऱ्या दिवशी (१५ डिसेंबर) आर्य संगीत प्रसारक मंडळाने निर्मिती केलेल्या पं. भीमसेन जोशी यांच्या सांगीतिक जीवनावर आधारित चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येईल. ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांचे पुत्र आलम खाँ यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम १६ डिसेंबर रोजी होईल.

हेही वाचा- पुणे : डांबरीकरणाच्या कामामुळे कात्रज घाटात एकेरी वाहतूक

महोत्सवातील शताब्दी स्मरण चित्रप्रदर्शनाविषयी सतीश पाकणीकर म्हणाले, पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या प्रकाशचित्रांवर आधारित असेल. प्रकाशचित्रात टिपला गेलेला प्रत्येक क्षण आपल्याला पुन्हा तो क्षण जगण्याचा आनंद देतो. प्रकाशचित्राचे हे सामर्थ्य या प्रदर्शनातून पुन्हा एकदा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. अनिल देशपांडे व सुधाकर जोशी यांच्यासह माझ्या संग्रहातील अनेक प्रकाशचित्रातून आपल्याला यावर्षी देखील काळाच्या पडद्याआड गेलेली मैफल परत एकदा अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवाचे मुख्य आयोजक पं. भीमसेनजी व महोत्सवात आपली कला सादर करायला येणारे कलाकार यांच्यातील स्नेहाचे, एकमेकांच्या कलांना दाद देतानाचे, सत्काराचे, आदराचे, प्रेमाचे संबंध किती अकृत्रिम आणि अत्यंत साधेपणाचे होते हे या प्रदर्शनात पाहता येईल. कॅमेऱ्याने टिपलेल्या ‘भीमसेनी मुद्रा’ ही या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असेल.

हेही वाचा- आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून न्यायालयात आव्हान

  • महोत्सवानंतर रसिकांना घरी जाण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पीएमपीएमएलची बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुकुंदनगर येथून भक्ती शक्ती चौक, (निगडी), मारुती मंदिर (धायरी), कोथरूड डेपो (पौड रस्ता) आणि वारजे माळवाडी या चार मार्गांवर बससेवा असेल.
  • ओला आणि उबर या वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या ॲपवर ‘सवाई २०२२’ असे टाकल्यास कोणत्याही ठिकाणाहून महोत्सवाला येण्याचा मार्ग दिसू शकणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी महोत्सवाच्या ठिकाणी पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.
  • रिक्षा संघटनांशी चर्चा असून त्यांनी महोत्सवासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.