पुणे पोलिसांची पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अनोखी योजना
गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. कोयता गँगच्या गुंडांनी तर धुमाकूळ घातला असून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मात्र यात पोलिसांना म्हणावे तसे यश येताना दिसत नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता एक अनोखी योजना सुरू केली आहे. ‘गुंडांना पकडा आणि बक्षीस मिळवा’ अशी ही योजना आहे.