पुणे प्रतिनिधी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच श्वान प्रेम सर्वांना माहिती असून आज पुण्यातील कात्रज भागातील गुजर वाडी येथे युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीचे उदघाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.तर या कार्यक्रमाचे आयोजन मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी केले होते. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जेम्स या कुत्र्याचा मृत्यू काही महिन्यापुर्वी झाला होता.तर त्याचे चित्र या प्रकल्पाच्या आवारातील पत्र्याच्या शेडवर रेखाटण्यात आले आणि ते चित्र राज ठाकरे पाहतच राहिले.
या प्रकल्पा बाबत वसंत मोरे म्हणाले की,पुणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त असून त्यामुळे नागरिकांना चावण्याच्या घटना अधिक प्रमाणात घडत आहे.त्या गोष्टीचा विचार करीता युनिव्हर्सल अँनिमल वेल्फेअर सोसायटीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे.यामध्ये कुत्र्यांवर उपचार आणि नसबंदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की, काही महिन्यापुर्वी राज ठाकरे यांच्या जेम्स या कुत्र्याचा मृत्यू झाला होता.त्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाच्या आवारातील पत्र्याच्या शेडवर जेम्सचे चित्र रेखाटण्यात आले.ते पाहून साहेबांनी कौतुक केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.