देशातील विद्यार्थ्यांना देशाचा समृद्ध वारसा, संस्कृती, वास्तू, वन्यजीवन माहिती होण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने योजना तयार केली आहे. त्यानुसार विद्यापीठे-उच्च शिक्षण संस्थांना आता पर्यटन स्थळ दत्तक घ्यावे लागणार असून, विद्यार्थ्यांनी संबंधित पर्यटनस्थळी भेट देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन, सहली आयोजित करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत.

हेही वाचा >>>पुणे: विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मोबाइलवर ध्वनिचित्रफीत, छायाचित्र काढून मुलीला धमकावले

कायद्याची पदवी, यूपीएससीसाठी सोडली सीएची नोकरी; जाणून घ्या IAS सोनल गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास
Rat tail in student food akola
अकोला : विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात उंदराचे शेपूट! दहा विद्यार्थ्यांना विषबाधा
AJIT PAWAR AND BUDGET
सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…
नागपूर ‘एम्स’मध्ये अधिष्ठाता पदांच्या निकषांना छेद ! कायद्यात अशी आहे तरतूद..

यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी या संदर्भातील परिपत्रक आणि योजनेचे संकल्पपत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. उच्च शिक्षणात होणारे बदल, नवी धोरणे या संदर्भात यूजीसीकडून सातत्याने विविध मार्गदर्शक सूचना, परिपत्रके प्रसिद्ध करण्यात येत असतात. त्याशिवाय केंद्रीय मंत्रालयांच्या योजनांशी संबंधित उपक्रम राबवण्याबाबत निर्देशही दिले जातात. त्यात आता पर्यटन मंत्रालयाच्या नव्या योजनेची भर पडली आहे. त्यामुळे आता पर्यटनवाढीसाठी विद्यार्थी आणि विद्यापीठांना काम करावे लागणार आहे.

हेही वाचा >>>‘कोयत्या गँग विरोधात मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू’; चंद्रकांत पाटील यांची माहिती

यूजीसीच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांचे देशाविषयीचे ज्ञान वाढण्यासाठी प्रत्येक विद्यापीठाने एक पर्यटन स्थळ निवडावे, त्या ठिकाणाविषयी माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, त्या ठिकाणाशी संबंधित उपक्रमांचे वर्षभर आयोजन करावे, अभ्यास सहलीचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना पर्यटन स्थळी जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव समाजमाध्यमांत प्रसारित करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>“माझ्या सारख्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धडा शिकला पाहिजे”; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधान

होणार काय?
शहर, गाव, अभयारण्य किंवा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले एक ठिकाण विद्यापीठाने निश्चित करून दत्तक घ्यायचे आहे. पर्यटन स्थळांची यादी http://www.incredibelindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित ठिकाणाच्या अनुषंगाने चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा आदी उपक्रम वर्षभर आयोजित करावे लागतील. तसेच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ, संग्रहालय, अभयारण्य, हस्तकला केंद्र अशा ठिकाणी विद्यार्थ्यांची दोन ते तीन दिवसांसाठी अभ्यास सहल आयोजित करावी लागेल. त्यासाठी विद्यापीठांनी राज्यातील पर्यटन अधिकाऱ्याशी संपर्क साधून माहिती घ्यावी लागेल. जेणेकरून संग्रहालयासारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफ केले जाईल. भेटीनंतरचा अहवाल विद्यापीठाने सादर करायचा आहे.