मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या घोराडेश्वर दरीत सोमवारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० वर्ष असून चार दिवसांपासून हा मृतदेह या ठिकाणी असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सोमवारी सकाळी डोंगरावर असलेल्या घोरवाडेश्वर मंदिराचे पुजारी गणेश बोडके यांना दरीत मृतदेह दिसला. त्यांनी पोलिसांना याबद्दल कळवले.

५० फूट खोल दरीतील मृतदेह काढण्यासाठी पोलिसांनी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रमंडळ रेस्कू टीमला बोलवले होते. मोठ्या शर्थीने दुपारी मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात या टीमला यश आले. मयत व्यक्तीचा एक बूट ५० फुटांवर आढळला आहे. साधारण चार दिवसांपूर्वी व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ही हत्या आहे की, आत्महत्या याचा तपास तळेगाव पोलीस करत आहेत.

crime
मंदिरात जिवंत नागपूजा, पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…
Pimpri, Instagram friendship, theft, Woman flees, man's phone, meetup,
मैत्रिणीने ‘इंस्टाग्राम’ वर मॅसेज करुन भेटायला बोलविले आणि….
police commissioner nagpur
चक्क पोलीस आयुक्तांनी पकडला कुख्यात गुंड