पिंपरी : चिंचवड शहरात विजांच्या कडकडाटात संध्याकाळपासून मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. आज सकाळ पासून पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते. साडेचारच्या सुमारास ढग दाटून आले आणि काही वेळातच विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसाचा फटका मावळ भागातील शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे, शेतमालाचे आणि पिकाचे मोठे नुकसान झालं असल्याची भिती व्यक्त होत आहे.

हेही वाचा… चुकीच्या गोष्टी करण्याची आवश्यकता नसते, गुणवत्तेच्या जोरावर कामे मिळतात – अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर

pune vegetable prices marathi news, pune vegetable prices today marathi news
पुणे : अवकाळी पावसाचा फळभाज्यांना फटका; हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या दरात वाढ
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
akola unseasonal rain marathi news
अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा; चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ५५ घरांची पडझड
Chance of light showers of rain in Palghar and Thane on Monday and Tuesday
पालघर, ठाण्यामध्ये सोमवार, मंगळवारी हलक्या सरींची शक्यता

हेही वाचा… पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

काल बुधवारी पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील काही भागात गारपीट झाली होती. कालपासून मावळ परिसरामध्ये गहू, हरभरा, बटाटा या पिकांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. तर दुसरीकडे वातावरणातील या बदलामुळे आजार वाढण्याची शक्यता देखील पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या डॉक्टरांनी वर्तवली आहे.