एनडीए आणि नौदल अकादमीची प्रवेश परीक्षा १४ नोव्हेंबरला ; महिला उमेदवारही या वर्षीपासून परीक्षेस पात्र

र्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महिलाही या परीक्षेसाठी आता पात्र असून त्यासाठीच तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि एझिमला येथील भारतीय नौदल अकादमी या संरक्षण क्षेत्रातील तयारीचे प्राथमिक शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या प्रवेश परीक्षा १४ नोव्हेंबरला होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महिलाही या परीक्षेसाठी आता पात्र असून त्यासाठीच तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत या परीक्षा घेतल्या जातात. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात या परीक्षा होणे अपेक्षित होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महिलांनाही या वर्षीपासून ही परीक्षा देणे शक्य व्हावे, यासाठी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. देशातील सुमारे ७० केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर त्याबाबत अधिक माहिती उपलब्ध असून संकेतस्थळावरून परीक्षार्थी उमेदवार आपले प्रवेशपत्र प्राप्त करू शकणार आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची प्रवेश परीक्षा महिला उमेदवारांनाही देता यावी याबाबतचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून १८ ऑगस्ट २०२१ रोजी देण्यात आले. यंदाच्या वर्षीपासून या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात नियोजित असलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे नव्या वेळापत्रकानुसार आता १४ नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Upsc nda exam 2021 nda and naval academy exams on 14 november zws

ताज्या बातम्या