पुणे : देशभरातील नागरी सहकारी बँकांना आता एकाच छत्राखाली सेवा मिळणार असून, या बँकांच्या अडचणी सोडवण्यासोबत त्यांना पाठबळही दिले जाणार आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेच्या पुढाकारातून नागरी सहकारी बँकांसाठी देशव्यापी शिखर संस्था स्थापन होत आहे. तिच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अतुल खिरवडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नागरी सहकारी बँकांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळाची निर्मिती झाली आहे. दिल्लीस्थित या संस्थेचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अतुल खिरवडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खिरवडकर हे कल्याण जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. नुकताच त्यांनी बँकेचा राजीनामा देऊन महामंडळाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Paytm Payments Bank Managing Director and CEO Surinder Chawla resigns
पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी सुरिंदर चावला यांचा राजीनामा
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री
mns trade union vice president raj parte attacked attacked with Rods and knife
मनसे कामगार सेनेच्या अंतर्गत वादातून उपाध्यक्षावर चाकू व रॉडने हल्ला; दोन पदाधिकाऱ्यांसह १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा
pune lok sabha election latest marathi news, pune loksabha marathi news, pune lok sabha 2024 marathi news
पुणे : निवडणुकीतील गैरप्रकारांवर २६४ पथकांकडून देखरेख

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड महापालिकेची विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात गिफ्ट; शालेय साहित्यासाठी मिळणार ‘एवढी’ रक्कम

महामंडळाकडून नागरी सहकारी बँकांना विविध सेवा पुरवल्या जाणार आहेत. यात कर्ज सुविधा, तरलता पुरविणे, निधी व्यवस्थापन, गुंतवणूक, देयक आणि तडजोड, माहिती तंत्रज्ञान, एटीएम नेटवर्क, व्यवस्थापन सल्ला, भांडवल उभारणी, डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड, कर्ज रोख्यांची खरेदी-विक्री आदी सेवांचा समावेश आहे. याचबरोबर नागरी बँकांचे विलीनीकरण अथवा एकत्रीकरण प्रक्रियेमध्ये सहकार्य करणे, वसुली अधिकाऱ्याची भूमिका बजावण्याचे कामही महामंडळ करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>> पुणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीमुळे परदेशी नागरिकाला असा मिळाला दिलासा!

सहकारी तत्त्वाऐवजी बँकेतर वित्तीय संस्था

देशात सहकारी आर्थिक रचनेतील त्रिस्तरीय संरचनेत प्रत्येक राज्यातील राज्य बँक म्हणजेच शिखर बँक व जिल्हा बँकांकडून नागरी सहकारी बँकांना मदत केली जाते. या पार्श्वभूमीवर नागरी सहकारी बँकांसाठी शिखर संस्था स्थापन करण्याची चर्चा सुरू होती. सुरुवातीला सहकारी तत्त्वावर ही संस्था स्थापन व्हावी, असा आग्रह धरण्यात आला होता. रिझर्व्ह बँकेने तांत्रिक कारण पुढे केल्याने बँकेतर वित्तीय संस्था (एनबीएफसी) म्हणून ती अस्तित्वात येत आहे.

शिखर संस्थेला नागरी सहकारी बँकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १७५ ते २०० नागरी सहकारी बँकांनी भागभांडवल दिले आहे. शिखर संस्थेमुळे बँकांना एकाच ठिकाणी सर्व सेवा मिळतील. – अतुल खिरवडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळ

नागरी सहकारी बँकांना सेवा पुरवठादार म्हणून ही शिखर संस्था काम करणार आहे. तिच्याकडून कर्ज व तरलता पुरवठा झाल्यास नागरी सहकारी बँकांना फायदा होईल. यामुळे अडचणीतील बँकांनाही पाठबळ मिळेल. – विद्याधर अनास्कर, बँकिंगतज्ज्ञ