पुणे: शाळकरी मुलीचा पाठलाग करुन त्रास देणारा गजाआड; उत्तमनगर भागातील घटना | Uttamnagar police arrested a young man who chased and harassed a school girl pune print news amy 95 | Loksatta

पुणे: शाळकरी मुलीचा पाठलाग करुन त्रास देणारा गजाआड; उत्तमनगर भागातील घटना

शाळकरी मुलीचा पाठलाग करुन तिला त्रास देणाऱ्या एका तरुणाला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली.

पुणे: शाळकरी मुलीचा पाठलाग करुन त्रास देणारा गजाआड; उत्तमनगर भागातील घटना
प्रतिनिधिक छायाचित्र

शाळकरी मुलीचा पाठलाग करुन तिला त्रास देणाऱ्या एका तरुणाला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली. गौरव गणेश धावडे (वय २५, रा. बालाजी रेसीडन्सी, उत्तमनगर, एनडीए रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत शाळकरी मुलीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>>पुणे: गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात बदल करण्याची विद्यापीठाची भूमिका

पंधरा वर्षीय शाळकरी मुलीचा आरोपी धावडे हा पाठलाग करायचा. त्याने तिला मैत्री करण्यास सांगितले. तिने नकार दिल्यानंतर आरोपी धावडे मोटारीतून तिच्या घराजवळ गेला. मुलीने याबाबत तक्रार दिल्यानंतर धावडेला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 15:15 IST
Next Story
पुणे: गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात बदल करण्याची विद्यापीठाची भूमिका