Vaccine shortage : पुण्यातील सर्व केंद्रांवर उद्या लसीकरण बंद राहणार!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आजच पुण्यातील करोना परिस्थितीबाबत आढावा बैठक झाली आहे.

संग्रहीत

पुणे महानगर पालिका क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्रांवर उद्या(२२ मे) लसीकरण होणार नाही. अपुऱ्या लस साठ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या हवाल्याने एएनआयाने या संदर्भात वृत्त दिले आहे.

पुण्यातील करोना स्थितीचा आढावा घेतल्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील परिस्थितीबद्दल माध्यमांना माहिती दिली. पुण्यात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुण्यात आता सर्व प्रकारचे बेड्स असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर आता जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन, रेमडेसिविर यांचा तुटवडा नसल्याचंही ते म्हणाले.याचबरोबर, ग्रामीण भागातली रुग्णसंख्या अजूनही अपेक्षेप्रमाणे आटोक्यात आली नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

तिसऱ्या लाटेशी लढण्यास राज्य सक्षम- अजित पवार

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱी इन्जेक्शन्स मात्र राज्याकडे पुरेशी उपलब्ध नाहीत. त्यांचा तुटवडा आहे. मात्र, त्यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करत आहोत, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. या इन्जेक्शन्ससाठी थेट उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, त्यांना सर्व इन्जेक्शन्स केंद्राकडे देणं बंधनकारक असल्याने ते थेट देऊ शकत नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vaccination to remain closed on 22 may at all centers in pune municipal corporation area due to shortage of vaccine stock msr

ताज्या बातम्या