दिवाळीतील पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदेला बुधवारी (२६ ऑक्टोबर) वहीपूजनासाठी सकाळ आणि संध्याकाळी मुहूर्त आहेत. दिवाळीतील पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त. या दिवशी लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन करून व्यापारी लोक वहीचे पूजन करतात. वही पूजनासाठी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटे ते ९ वाजून ३० मिनिटे आणि सकाळी ११ ते दुपारी १२ वाजून १५ मिनिटे ही शुभ वेळ आहे.

त्याचप्रमाणे दुपारी ४ वाजून ३० मिनिटे ते सायंकाळी ६ या वेळातही वहीपूजन करता येईल. ज्यांना सायंकाळी वही पूजन करायचे आहे अशा व्यापाऱ्यांसाठी सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटे ते रात्री ९ वाजून १० मिनिटे या वेळेत वहीपूजनासाठी शुभमुहूर्त असेल, असे खगोल अभ्यासक आणि देशपांडे पंचांगकर्ते पंडित गौरव देशपांडे यांनी सांगितले.

Gudi Padwa Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला बाजारात उत्साह, ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी
gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
nashik police conduct combing operation across the city due to festivals celebrations
नाशिक : सण, उत्सवांमुळे अवैध शस्त्रसाठा शोध मोहीम