scorecardresearch

भीमा कोरेगावच्या लढाईत गुलामी संपली : प्रकाश आंबेडकर

भीमा कोरेगाव शौर्यदिनाचे यंदाचे २०५ वे वर्ष असून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी भीमा कोरेगावमध्ये येथे दाखल झाले आहेत

भीमा कोरेगावच्या लढाईत गुलामी संपली : प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर

भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. शौर्यदिनाचे यंदाचे २०५ वे वर्ष असून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी भीमा कोरेगावमध्ये येथे दाखल झाले आहेत. त्याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभास अभिवादन केले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा- पुणे : नळस्टॉप चौकात सुशोभीकरण; वाहतूक कोंडीला निमंत्रण

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की,आपल्या देशात हजारो वर्ष राजकीय गुलामी होती. पण भीमा कोरेगावच्या लढाईत गुलामी संपली. भारताच्या स्वातंत्र्याच सामाजिक आणि राजकीय इतिहासाला येथून सुरुवात झाली. त्यामुळे आजच्या दिवशी हजारो लाखो नागरिक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे मी आजचा दिवस आनंदाचा मानत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- डिसेंबरमध्ये झाकोळलेली थंडी जानेवारीत अवतरणार! देशासह महाराष्ट्रात बहुतांश भागांत तापमान सरासरीखाली

करणी सेनेचे अध्यक्ष अजय सेंगर यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले की, कोणी काय विधान करावं. ते विचारपूर्वक करावं नाही.तर ते त्यांच्याच आंगलट येतं.अशी परिस्थीतीती आहे. पण करणी सेनेच्या मागे कोणीच नाही. हे यातून सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
भीमा कोरेगाव येथे अभिवादन करण्यास अद्याप पर्यंत कोणताही नेता आला नाही. त्यावर ते म्हणाले की, कोणी अभिवादन करायला यायच न यायच हा त्यांचा प्रश्न असल्याच त्यांनी यावर भूमिका मांडली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 09:37 IST

संबंधित बातम्या