बारामती : बारामती येथील सतरा वर्षीय विशेष विद्यार्थिनी वरदा संतोष कुलकर्णी यांनी आपल्या अपंगत्वावर मात करत “पॅरा स्विमर” ( विशेष अपंगासाठी घेण्यात आलेल्या पोहण्याची स्पर्धा ) मध्ये सहभागी होऊन अनेक बक्षिसे व पुरस्कार प्राप्त केले आहेत.

याबाबत वरदा हिचे वडील संतोष कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९, २०२०, २०२२, आणि २०२४ या काळात पुणे जिल्हा पुणे व समाज कल्याण विभाग आयोजित स्पर्धेत वरदा हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, या पाठोपाठ महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिव्यांग मुला मुलींच्या पुणे बालेवाडीत झालेल्या २०२३ च्या राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या या मध्ये वरदा कुलकर्णी यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे,

पॅरा असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धा डोंबिवली मुंबई येथे ऑक्टोबर २०२३ मध्ये पार पडल्या, या स्पर्धेमध्ये पन्नास मीटर फ्रीस्टाइल व १०० मीटर फ्रीस्टाइल सिल्वर मेडल व नॅशनल साठी निवड करण्यात आली, तसेच कारगिल दिनानिमित्त आयोजित शारदा नगर जलतरण स्पर्धेत खुल्या गटातून ५० मीटर फ्री स्टाइल व १०० मीटर फ्री स्टाइल मध्ये प्रथम क्रमांक तिने मिळवला, यानंतर स्पेशल ओलंपिक भारत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा नागपूर येथे जानेवारी २०२४ मध्ये पार पडल्या यामध्ये तिने २५ मीटर व ५० मीटर फ्री स्टाइल स्विमिंग मधून प्रथम क्रमांक मिळवला आणि नॅशनल साठी सुद्धा तिची निवड करण्यात आली. बारामतीच्या वरदा कुलकर्णी साठी ही वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली आहे. स्पेशल ओलंपिक भारत नॅशनल स्पर्धा २०२४ मध्ये मंड्या कर्नाटक येथे आयोजित झाल्या या स्पर्धेत बटरफ्लाय १०० मीटर मध्ये प्रथम , दोनशे मीटर फ्रीस्टाइल मध्ये द्वितीय क्रमांक तर शंभर मीटर मिक्स रिले मध्ये तृतीय क्रमांक तिने प्राप्त केला आहे.

समुद्र राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा मालवण येथे एक किलोमीटरची घेण्यात आली होती, २०१९ मध्ये सहावा क्रमांक तिने मिळवला, त्यानंतर घेतलेल्या २०२२ मध्ये तिने चौथा क्रमांक मिळवला तर २०२३ मध्ये तिने तिसरा क्रमांक पटकावला होता.

नॅशनल ओपन सी स्विमिंग कॉम्पिटिशन पोरबंदर गुजरात येथे एक किलोमीटर समुद्र जलतरण स्पर्धेमध्ये वरदा हीने पाचवा क्रमांक मिळवला आहे. कोल्हापूर जिल्हा आयोजित रंकाळा तलावात एक किलोमीटर स्पर्धा मध्ये याच गटातून वरदाने सहभाग मिळवला, वीर सावरकर जलतरण स्पर्धा बारामती येथे १३ ऑक्टोबर २०२४ मध्ये पार पडल्या या स्पर्धेमध्ये ५० मीटर मध्ये प्रथम क्रमांक तिने प्राप्त केला आहे .

यशाची एक एक शिखरे पार करत वरदा कुलकर्णी यांनी पॅरा ऑलिंपिक स्पर्धे २७ ते २९ सप्टेंबर २०२४ या काळात स्पर्धा कल्याण मुंबई येथे पार पडल्या, या स्पर्धेमध्ये तिने शंभर मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले, शंभर मीटर बटरफ्लाय मध्ये सुवर्णपदक जिकंले , दोनशे मीटर फ्री स्टाइल मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.

पॉरा ऑलिंपिक स्विमिंग राष्ट्रीय स्पर्धा १८ ते २२ ऑक्टोबर २०२४ दरम्यान गोवा मधील पणजी येथे पार पडल्या, यामध्ये तिने शंभर मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले होते ,वरदा यांनी इथपर्यंतच येऊन न थांबता तीने आपली यशाची एक एक शिखरे पार करत असताना ” पॅरा ओलंपिक कमिटी तामिळनाडू व सायवस इंडिया व विराटस इंटरनॅशनल स्पर्धा ” तीन डिसेंबर ते पाच डिसेंबर २०२४ मध्ये चेन्नई येथे पार पडल्या होत्या, या स्पर्धेमध्ये १०० मीटर बटरफ्लाय सुवर्णपदक, दोनशे मीटर फ्रीस्टाइल मध्ये रजत पदक सुद्धा जिंकल्या आहेत.

पोहण्या सह नृत्य, कला, क्रीडा मध्येही वरदाचे यश…

पर्पल जल्लोष पिंपरी चिंचवड पुणे यामध्ये १९ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या कार्यक्रमांमध्ये वरदा हिने नृत्य सादरीकरण केले, सकाळ चित्रकला स्पर्धा दिव्यांग गटातून बारामती विभागात ती प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बारामती यांच्याकडून क्रीडा क्षेत्रातील नैपुण्या बाबत वरदा हिला २०२४ मध्ये नवदुर्गा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते, तसेच जिल्हास्तरीय सॉफ्ट बॉल स्पर्धेत वरदा हिने ब्रांच मेडल मिळवले, इनर व्हील क्लब आयोजित पुणे येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये नृत्य सादरीकरण करण्याची तिला संधी प्राप्त झाली आहे . तीन डिसेंबर २०२३ रोजी जागतिक अपंग दिना निमित्त बारामती येथील वसुंधरा रेडिओ वाहिनीवर वरदा कुलकर्णीची विशेष मुलाखत सादर करण्यात आलेली होती . #

वरदा कुलकर्णी या कार्यक्षम राष्ट्रीय जलतरणपटू आहेत, बारामती मधील बालकल्याण केंद्र या शाळेच्या वरदा संतोष कुलकर्णी या विद्यार्थिनी आहे. बौद्धिक अक्षमता असूनही तिने जलतरण स्पर्धेत कौतुकास्पद काम केले असून नृत्य आणि कला क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा तीनी सर्वं उत्तम कामगिरी केली आहे. -संदीप शिंदे, शिक्षक

अपंगत्वावर मात करून वरदा कुलकर्णी हिने अल्पकाळामध्ये जलतरण स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे, वरदा कुलकर्णीला गेले तीन वर्षापासून योग्य मार्गदर्शन करुन तीला विविध जलतरण स्पर्धेत तिने सहभाग होण्यासाठी आम्ही प्रोत्साहित केले होते,त्यामुळे वरदा कुलकर्णी सध्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धे पर्यंत पोहोचल्या आहेत. -सुभाष बर्गे, जलतरण शिक्षक, कोच

वरदा संतोष कुलकर्णी या एक उकृष्ठ (पॅरा स्विमर )जलतरणपटू आहेत, खूपच मेहनती असून त्यांनी आपल्या यशा साठी विशेष प्रयत्न केले आहेत, या मधूनच वरदाला मोठे यश मिळाले आहे. -ओम सावळे पाटील, प्रशिक्षक वीर सावरकर तलाव, बारामती