पुणे : जिल्ह्यातील पाण्याची समस्या असणाऱ्या १०३ गावांमध्ये विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गेल्या आणि चालू वर्षात मिळून १२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ही गावे टँकरमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याची समस्या सुटून शेतीलाही पाणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी गेल्या वर्षी आठ कोटी, तर नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चार कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात ज्याठिकाणी अग्निजन्य खडक आहे तेथे भूगर्भातील पाण्याच्या साठ्यांचे प्रमाण अत्यल्प किंवा जवळजवळ नाहीच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १०३ गावांमध्ये दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. या गावांना कायमस्वरूपी टँकरमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील १०३ गावांची निवड करताना त्यांचा गेल्या ३० वर्षांच्या पर्जन्यमान व भूजल पातळीचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार या गावांमध्ये भूजल स्त्रोत आणि ते वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील यासाठी जीएसडीच्या मदतीने अभ्यास करण्यात आला आहे. जलजीवन अभियानांतर्गत बहुतांश गावपातळीवरील योजना आणि जिल्ह्यातील बहुतांश सिंचन हे भूजल स्त्रोतांवर अवलंबून आहे. भूजलाच्या उपशामुळे अनेक भागात भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. पाण्याची उपलब्धता वाढवून हे चक्र बदलण्यासाठी पुनर्भरण टाक्या बांधून भूजल स्त्रोत बळकट केले जात आहेत. भूजलाद्वारे शेती आणि घरांना पाणी उपलब्ध करून देणे सोपे आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Nagpur, Maherghar, safe delivery
नागपूर : सुरक्षित प्रसूतीसाठी चार माहेरघर कधी?
nashik, 14 Malnourished Children, Found in Trimbakeshwar Taluka, Treatment Malnourished Children , malnutrition in Trimbakeshwar Taluka, malnutrition in nashik, nashik news, Trimbakeshwar news,
त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके, ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्याचे आदेश
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई
Gutkha worth 21 lakh seized at different places in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी २१ लाखाचा गुटखा जप्त

जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद उपकर निधीतून भूजल स्त्रोत बळकट करण्याचे अभियान राबविले आहे. त्यामध्ये जलशक्ती मिशन – पाऊस पडका, अटल भूजल योजना यातून या १०३ गावांसाठी टँकरमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. तसेच जलजीवन मिशन आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या कार्यक्रमांतर्गत या गावांतील ११४ तलावांमध्ये अधिक पाणी साठून राहण्यासाठी व अधिक भूजल पुनर्भरण करण्यासाठी ते गाळमुक्त केले जात आहे. याशिवाय टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या गावांना जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या विशिष्ट भूजल स्त्रोतांना बळकट करण्यासाठी १०३ पैकी ८८ गावांत ३०३ ठिकाणी पुनर्भरण मंजूर करण्यात आले आहे. या १०३ गावांपैकी १५ गावांमध्ये जमिनीखाली काळा कातळ किंवा अग्निजन्य खडक असल्याने भूगर्भात जलसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे याठिकाणी पुनर्भरण मंजूर करण्यात आलेले नाहीत. त्यासाठी जीएसडीएने भूवैतज्ञानिक सर्वेक्षणाद्वारे जागा निश्चित केल्या आहेत, असेही आयुष प्रसाद यांनी सांगितले.

जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावे

आंबेगाव तीन, बारामती १८, दौंड एक, हवेली चार, इंदापूर २५, जुन्नर दोन, खेड चार, मुळशी एक, पुरंदर २४, शिरूर पाच आणि वेल्हा चार.