पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे विश्वासू अण्णा बनसोडे विरुद्ध शरद पवार गटाच्या सुलक्षणा शीलवंत- धर अशी थेट लढत आहे. आमदार अण्णा बनसोडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. अगदी त्यांच्या शपथविधी वेळी देखील अण्णा बनसोडे हे अजित पवारांसोबत होते, हे सर्वश्रुत आहे. परंतु, पिंपरी मतदारसंघात सजग मतदाराने त्यांच्या संबंधित काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघात फलक लावून विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना काही प्रश्न विचारले आहेत.

पिंपरी मतदारसंघात अनेक समस्या आहेत. पिंपरी बाजारपेठेत नेमहमीच वाहतूक कोंडी असते. याकडे ना प्रशासन लक्ष देत, ना आमदार. त्यामुळे राजकीय व्यक्तींबाबत पिंपरी मधून नाराजी आहे. अण्णा बनसोडे हे चौथ्यांदा पिंपरी विधानसभा निवडणूक लढवत आहेत. काही दिवसांपूर्वीच उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर महायुतीतील एक गट अण्णा बनसोडे यांच्यावर नाराज होता. ही नाराजी दूर करण्यात अण्णा बनसोडे यांना कितपत यश आला आहे लवकरच समजेल.

Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!

आणखी वाचा-भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”

अण्णा बनसोडे यांनी २००९ मध्ये पहिल्यांदा पिंपरी विधानसभेत विजय मिळवला. २०१४ ला त्यांचा पराभव झाला. तर २०१९ ला पुन्हा ते पिंपरी विधानसभेतून विजयी झाले. चौथ्यांदा पिंपरी विधानसभा लढवत असून त्यांच्यासमोर शरद पवार गटाच्या नेत्या सुलक्षणा शीलवंत- धर यांचं आव्हान असेल. शीलवंत यांच्याकडे सुशिक्षित चेहरा म्हणून पाहिला जात आहे. शिलवंत यांचं आव्हान अण्णा बनसोडे यांना कठीण जाऊ शकतं. असं बोललं जातं आहे. अशातच आता पिंपरी विधानसभा मतदारसंघातून विविध प्रश्नांबाबत फलक लावून अण्णा बनसोडे यांना प्रश्न विचारण्यात आले आहेत.

आणखी वाचा-‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू

नेमकं फलकांवर काय प्रश्न मांडण्यात आले आहेत पाहूयात

आमदार अण्णा बनसोडे यांना विचारण्यात आलेले प्रश्न खालील प्रमाणे: एमआयडीसी बळकट करण्यासाठी तुम्ही काय केलं?, ट्राफिक समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय केलं?, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेत किती लक्षवेधी मांडल्या?, मतदारसंघातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं?, कोविड काळात नागरिकांसाठी तुम्ही काय केलं?, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तुम्ही काय केलं?. असा उल्लेख असलेले विविध फलक पिंपरी विधानसभा मतदारसंघात मुख्य रस्त्यांच्या होर्डिंगवर लावण्यात आले आहेत.

Story img Loader