राज्याच्या ग्रामीण भागात होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांसह स्त्रीभ्रूणहत्या, पर्यावरणाची हानी, व्यसनांचे वाढते प्रमाण, पाण्याचा अपव्यय अशा प्रश्नांबाबत प्रबोधन आणि जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय वारकरी साहित्य परिषदेने पुढाकार घेतला आहे. ‘घेऊन सप्रेम जय हरी, पंढरीचा वारकरी’ या उपक्रमांतर्गत सप्तसूत्री कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

‘साधून संवाद बळीराजाचा, करू विचार दूर आत्महत्येचा’, ‘मुला-मुलींचा विवाह काटकसरीने करा’, ‘स्त्रीभ्रूणहत्या करू नका, भविष्यातील आईला मारु नका’, ‘बल बुध्दी वेचूनिया शक्ती, उदक चालवावे युक्ती’, ‘प्रत्येकाने एका तरी वृक्षाची लागवड करा’, ‘नका करु ग्रामस्वच्छता, नाहीच होणार घाण याची घ्या दक्षता’, ‘जो दारु गुटख्याचे व्यसन करी, त्याच्या श्रमाची लक्ष्मी जाईल नराधमाच्या घरी’ ही सप्तसूत्री परिषदेने तयार केली असून ती घरोघरी नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरावर परिषदेचे प्रतिनिधी पाहणी करून पुरस्कारांपात्र गावांची सूची तयार करणार आहेत. या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या आदर्श गावांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी परिषदेचे सचिव डॉ. सदानंद मोरे, खजिनदार अभय टिळक, कार्याध्यक्ष तनपुरे महाराज यांचे मार्गदर्शन लाभले असून परिषदेतर्फे २३ एप्रिल रोजी आळंदी येथे होणाऱ्या बैठकीमध्ये या सप्तसूत्रीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
chhagan bujbal
“माझा निर्णय दिल्लीतून ठरला, मात्र…”; नाशिकच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळांचे विधान
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्त्रीभ्रूणहत्या या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन होत नसल्याने जमिनी क्षारपड होतात. ग्रामीण भागात अनेक जण व्यसनापायी पसा वाया घालवून कर्जबाजारी होतात. लग्नकार्यामध्ये अवास्तव खर्च करून कर्जबाजारी होण्याची वेळ येते. लोकसहभागातून या समस्यांचे निराकरण करण्यासाठी परिषदेचे प्रतिनिधी गावांमध्ये जाऊन शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांचे प्रबोधन करणार आहेत. सप्तसूत्री कार्यक्रम प्रभावीपणे राबविणाऱ्या गावांना परिषदेतर्फे पुरस्कार दिले जाणार आहेत.

दर वर्षी दिंडीमध्ये साधारणपणे २५ लाख वारकरी सहभागी होतात. पुरस्कारांचा निधी उभा करण्यासाठी यंदा प्रत्येक वारकऱ्याने शंभर रुपयांचे सहकार्य करावे, असे आवाहन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे उद्योगांकडून सामाजिक उत्तरदायित्वांतर्गत (सीएसआर) निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.