मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने उज्जैन येथील अखिल भारतीय कालिदास समारोहामध्ये ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांचा ‘राष्ट्रीय कालिदास सन्माना’ने गौरव करण्यात आला. मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूबाई पटेल यांच्या हस्ते कामत यांच्यासह शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल ज्येष्ठ सतारवादक पं. बुधादित्य मुखर्जी, कथ्थक नृत्यातील योगदानाबद्दल डाॅ. पुरू दाधीच आणि ज्येष्ठ रंगकर्मी राजीव वर्मा यांना राष्ट्रीय कालिदास सन्मान प्रदान करण्यात आला. प्रत्येकी दोन लाख रुपये, प्रमाणपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. श्री तुलसी पीठाधीश्वर स्वामी रामभद्राचार्य आणि सांस्कृतिकमंत्री उषा ठाकूर या वेळी उपस्थित होत्या. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ४०० पेक्षा अधिक जागांवर निवडून येईल’; चंद्रकांत पाटलांचा विश्वास

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasudev kamat honored with national kalidas sanmaan pune print news dpj
First published on: 05-11-2022 at 22:57 IST