पुणे : घाऊक बाजारात आवक वाढल्याने टोमॅटो, ढोबळी मिरची, काकडी, फ्लाॅवर, घेवडा मटार या फळभाज्यांच्या दरात १० टक्क्यांनी घट झाली. हिरवी मिरचीच्या दरात वाढ झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून ११० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशातून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, राजस्थानातून ८ ते १० टेम्पो गाजर, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ ते ४ टेम्पो शेवगा, तामिळनाडूतून १ टेम्पो तोतापुरी कैरी, कर्नाटकातून ३ टेम्पो पावटा, कर्नाटक, गुजरातमधून प्रत्येकी २ टेम्पो भुईमुग शेंग, मध्य प्रदेश, राजस्थानातून मिळून २५ ते २६ टेम्पो मटार, तसेच मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून ४०० ते ४५० गोणी सातारी आले, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार २ ते ३ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, गाजर २ ते ३ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, पावटा २ ते ३ टेम्पो, ढोबळी मिरची १२ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, नवीन आणि जुना कांदा मिळून १२५ टेम्पो अशी आवक झाली. तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० ते ३५ टेम्पो अशी आवक झाली.
पालेभाज्यांच्या दरात घट
मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक वाढल्याने कोथिंबिर, मेथी, शेपूसह सर्व पालेभाज्यांच्या दरात शेकड्यामागे ५ ते १० टक्क्यांनी घट झाली. पुणे विभागातून कोथिंबिरीच्या दीड लाख, मेथीच्या ८० हजार, तसेच १२ हजार हरभरा गड्डीची आवक झाली. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – ८०० ते १५००, मेथी – ५०० ते ८००, शेपू – ५०० ते १०००, कांदापात – ८०० ते १२००, चाकवत – ५०० ते ८००, करडई- ४०० ते ७००, पुदिना – ३०० ते ६००, अंबाडी – ४०० ते ७००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा – ४०० ते ७००, चुका- ५०० ते ८००, चवळई – ३०० ते ६००, पालक – ८०० ते १५००, हरभरा गड्डी – ५०० ते १२००.
कलिंगड, पपईच्या दरात वाढ
घाऊक बाजारात कलिंगड, पपईच्या दरात वाढ झाली. संत्र्यांच्या दरात घट झाली. मोसंबी, डाळिंब, बोरे, खरबूज, अननस, चिकू, लिंबू, पेरु या फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील फळ बाजारात मोसंबी ४५ ते ५० टन, संत्री ४० ते ५० टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई १५ ते १६ टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, चिकू २ हजार गोणी, कलिंगड ८ ते १० टेम्पो, पेरू ३०० ते ३५० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), केरळहून अननस ६ ट्रक, बोरे ३५० ते ४०० गोणी अशी आवक झाली.

