पुणे : कडक ऊन, तसेच पूर्वमोसमी पावसामुळे फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला असून, बाजारात आवक कमी होत आहे. सर्व प्रकारच्या भाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. फळभाज्यांसह पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत.

घाऊक बाजारात गेल्या आठवडाभरापासून फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. नेहमीच्या तुलनेत गेल्या दोन आठवड्यांपासून बाजारात फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. त्यामुळे बहुतांश फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

Mumbai, Water storage, dams,
मुंबई : धरणांतील पाणीसाठा २५ टक्क्यांवर
bear attacks in Japan is looking to ease laws around shooting bears
माणसांपेक्षा अस्वलेच जास्त! जपानमध्ये अस्वलांच्या हल्ल्याबाबत केले जाणारे उपाय चर्चेत का?
Increase in water level of dams in the maharashtra state pune
राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ; आठ दिवसांत ६८ टीएमसी पाणीसाठा
loksatta analysis lack of banks in rural areas hit development in some districts
विश्लेषण : ग्रामीण भागांतील बँकांच्या कमतरतेमुळे असमतोल का वाढतो?
Mumbai, dam storage,
मुंबई : धरणसाठ्यात वाढ, पाणीसाठा १८ टक्क्यांवर
Arm mobile app will work for information about accidental death of wild animals
वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूच्या माहितीसाठी काम करणार ‘आर्म’ भ्रमणध्वनी ॲप
loksatta analysis centre state government clash over gst compensation
विश्लेषण : जीएसटी’चा आठवा वाढदिवस… विसंवाद, अपेक्षाभंगांचा वाढता आलेख?
price, vegetables, leafy vegetables,
गृहिणींना दिलासा… पालेभाज्यांच्या दरात किती घट झाली?

हेही वाचा – ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल; ‘एमएचटी-सीईटी’चे निकाल जाहीर

मध्यंतरी झालेल्या पावसामुळे फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला. फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले. नवीन लागवडीस किमान एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे फळभाज्यांचे दर तेजीत राहणार आहेत, असे त्यांनी नमूद केले.

फळभाज्यांचे एक किलोचे दर

कांदा – ४० ते ४५ रुपये

बटाटा – ४० ते ४५ रुपये

टोमॅटो- ७० ते ८० रुपये

भेंडी – १२० ते १४० रुपये

गवार – १५० ते १६०

वांगी – ८० ते १००

फ्लाॅवर – १०० ते १२०

कोबी – ७० ते ८०

मेथी – ४० ते ५०

कोथिंबीर – ५० ते ६०

कडक ऊन, तसेच पावसामुळे फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले. नवीन लागवड पावसावर अवलंबून आहे. मुसळधार पाऊस झाल्यास लागवड, तसेच प्रतवारीवर परिणाम होतो. मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. – प्रकाश ढमढेरे, भाजीपाला विक्रेते, किरकाेळ बाजार

हेही वाचा – आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी; १२ लाखांचे विदेशी मद्य जप्त

पालेभाज्यांच्या दरात तेजी

पावसाचा फटका पालेभाज्यांना बसला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. बाजारात चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर ५० ते ६० रुपयांपर्यंत आहे. मेथीच्या एका जुडीचे दर ४० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. बहुतांश पालेभाज्यांचे दर तेजीत असून, महिनाभर पालेभाज्यांचे दर तेजीत राहणार असल्याची माहिती मार्केट यार्डातील पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (१६ जून) कोथिंबीर एक लाख जुडी, तसेच मेथीच्या ३५ हजार जुडींची आवक झाली.